Pune Crime | बंडगार्डन परिसरात DJ वर ‘डांगडिंग’ ! ‘One8 कम्यून बार’ व ‘मिलर्स लक्झरी क्लब’वर गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बंडगार्डन परिसरात रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिम लावून संगीत वाजवणाऱ्या ‘One8 कम्यून बार’ (One8 Commune Bar) व ‘मिलर्स लक्झरी क्लब’वर (Millers Luxury Club ) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell, Pune) कारवाई केली आहे. पोलिसांनी हॉटेलमधून साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर जप्त केला आहे. ही कारवाई (Pune Crime) शनिवारी (दि.19) केली.

सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक बंडगार्डन परिसरातील राजा बहादुर मिल (Raja Bahadur Mill) येथील ‘One8 कम्यून बार’ व ‘मिलर्स लक्झरी क्लब’ येथे मोठ्या आवाजात सांउड सिस्टिमवर संगीत वाजवले जात असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याठिकाणी छापा टाकला असता रात्री दहा नंतर मोठ्या आवाजात संगीत सुरु असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोन्ही हॉटेलमधील एक लाख 70 हजार रुपये किमतीचे सांउड सिस्टिम जप्त केले आहे. पोलिसांनी हॉटेलवर पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत (Environment Protection Act) ध्वनी प्रदुषण अधिनियमानुसार (Noise Pollution Act) कारवाई केली. जप्त केलेला मुद्देमाल बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या (Bundgarden Police Station) ताब्यात देण्यात आला आहे. (Pune Crime)

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार (Senior Police Inspector Vijay Kumbhar), सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे (API Aniket Pote), पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाब कर्पे, मनिषा पुकाळे, इरफान पठाण, संदीप कोळगे यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | Dance on DJ in Bandgarden area till late night ! pune police crime branch action on ‘One8 Commune Bar’ and ‘Millers Luxury Club’ hotel