Pune Crime | ज्येष्ठ नागरिकास  सव्वा कोटी रुपयांचा गंडा; दत्तवाडी पोलिसांकडून बांधकाम व्यावसायिक हेमंत मराठेला अटक

पुणे : Pune Crime | कोकणात जागा विकसित करुन देतो, असे सांगून ज्येष्ठ नागरिकास तब्बल १ कोटी २५ लाख ५० हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या बांधकाम व्यावसायिकास (Builder) दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police Station) अटक केली आहे. हेमंत विष्णु मराठे Hemant Vishnu Marathe (वय ५६, रा. आपटे रोड, शिवाजीनगर) असे या बांधकाम व्यावसायिकाचे नाव (Pune Crime) आहे.

याप्रकरणी संजय कुलकर्णी (वय ६५, रा. अतुलनगर, वारजे) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पर्वतीतील भूमी सोसायटी,  सदाशिव पेठेतील (Sadashiv Peth) श्रीनिवास कन्स्ट्रक्शनचे कार्यालय, तसेच मराठे यांच्या घरी २८ एप्रिल २०१५ ते २२ मार्च २०१६ दरम्यान घडला (Pune Crime) आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत मराठे हे बांधकाम व्यावसायिक आहे. हेमंत मराठे आणि संजय कुलकर्णी हे ओळखीचे असून या ओळखीचा गैरफायदा घेऊन मराठे यांनी फ्लॅटचा प्लॅन व इमारत बांधण्याची जागा प्रत्यक्ष दाखवून डेव्हलप करत असलेले अ‍ॅग्रीमेट दाखविले. फिर्यादी यांना सवलत देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रोख व चेकद्वारे १ कोटी २५ लाख ५० हजार १ रुपये वेळोवेळी घेतले. प्रत्यक्षात त्यांच्याबरोबर कोणताही करार केला नाही. फिर्यादी यांना फ्लॅट व रक्कमही परत न करता फसवणूक केली आहे. या फिर्यादीनंतर दत्तवाडी पोलिसांनी हेमंत मराठे यांना अटक केली आहे. मराठे यांनी आणखी काही जणांची फसवणूक केली असल्याची पोलिसांचा संशय (Pune Crime) आहे. पोलीस उपनिरीक्षक साळुंखे अधिक तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Maharashtra Police | राज्यातील 10 परिविक्षाधीनपोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्तांच्या (DySp / ACP) नियुक्त्या

Pune Corporation | निविदा काढल्या नसतानाही ‘एक कोटी’ रुपयांच्या कामांची बिले सादर ! कोरोना काळात ‘स्मशानभूमीतील’ कामांच्या नावाखाली पालिकेच्या तिजोरीवर ‘दरोड्याचा प्रयत्न’; जाणून घ्या प्रकरण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Dattawadi Police Arrest Builder Hemant Vishnu Marathe in fraud case pune crime

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update