Pune Crime | पोलीस भरतीसाठी आला अन् वाईट संगतीला लागला; विना परवाना पिस्टल बाळगणाऱ्याला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कुख्यात गुंडाचे व्हॉट्सॲप स्टेटस ठेवून आणि पिस्टल (Pistol) बाळगून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाच्या दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police) मुसक्या (Arrest) आवळल्या आहेत. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे (Cartridge) जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई पुण्यातील (Pune Crime) सिंहगड रोडवरील वृंदावन नर्सरीच्या बाजुला दत्तवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या फुटपाथवर करण्यात आली.

 

चंद्रकांत उर्फ चंदु तुळशिराम माने Chandrakant alias Chandu Tulshiram Mane (वय – 20, सध्या रा. स्वप्नरूप सोसायटी, फ्लॅट नं . 504 , 5 वा मजला, पारी कंपनी जवळ, नऱ्हे, पुणे, मूळ रा. मु. पो. साकोळ, ता. शिरूर अनंतपाळ जि. लातूर Latur) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

दत्तवाडी पोलीस स्टेशन मधील तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हे पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अमंलदार शिवाजी क्षीरसागर (Shivaji Kshirsagar), पोलीस हवालदार कुंदन शिंदे (Kundan Shinde) आणि पोलीस अंमलदार राहुल ओलेकर (Rahul Olekar) यांना बातमी मिळाली की , एक तरुण नेहमी हडपसर (Hadapsar) मधील कुख्यात मयत गुन्हेगार सुजित वर्मा (Criminal Sujit Verma) याचे स्टेटस ठेवुन त्याद्वारे त्याच्या मित्रांमध्ये व ओळखीच्या लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करत असुन त्याने तीन दिवसांपूर्वी दत्तवाडी पानमळा परीसरात मित्रांमध्ये झालेल्या बाचाबाची दरम्यान पिस्टल आणले होते. तो तरुण पिस्टल घेऊन सिंहगड रोड, वृंदावन नर्सरीच्या बाजुला दत्तवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यालगत फुटपाथवर थांबलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जीवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी 40 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

पोलीस भरतीसाठी पुण्यात आला होता
आरोपी हा दोन वर्षापुर्वी लातुर भागातुन पोलीस भरतीच्या तयारीसाठी पुण्यात (Police Recruitment Pune) आला होता.
त्याने यापूर्वी देखील बीडमध्ये आर्मीसाठी भरती (Army Recruitment Beed) दिली होती.
विश्रांतवाडी भागामध्ये एका खाजगी अकॅडमी मध्ये (Private Academy) त्याने काहीमहिने भरतीपूर्व प्रशिक्षण सुध्दा केले आहे.
परंतु हडपसर भागातील काही गुन्हेगार मित्रांच्या नादी लागुन त्याने सदरचे पिस्टल स्वत: जवळ बाळगले व त्याद्वारे पानमळा भागात दहशत पसरवण्याचा त्याचा उद्देश असल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपीने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी खऱ्या पिस्टलसह हुबेहुब दिसणारे लाईटर सुध्दा ऑनलाईन मागवुन स्वत: कडे ठेवलेले होते.
मात्र पोलीसांनी कौशल्यपूर्वक तपास करीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
तसेच हे पिस्टल त्याने यापूर्वी काही गुन्हेगारी कृत्यांमध्ये वापरले आहे का ? त्याचे साथीदार कोण आहेत.
तसेच त्याने हे पिस्टल कोठुन मिळविले याबाबत दत्तवाडी पोलीसांकडून सखोल तपास सुरु आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Joint Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग राजेंद्र डहाळे (Addi CP Rajendra Dahale), पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad), सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार (Sinhagad Road Division ACP Sunil Pawar), वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर (Senior Police Inspector Krishna Indalkar), पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे (Police Inspector Vijay Khomane) यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार (PSI Swapnil Lohar), चंद्रकांत कामठे पोलीस हवालदार कुंदन शिंदे, राजु जाधव, पोलीस अंमलदार विष्णु सुतार अमित सुर्वे, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर, अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले, भरत अस्मार, प्रमोद भोसले, शरद राऊत यांनी केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Dattawadi Police Arrest Criminal

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा