Pune Crime | दहशत पसरवण्यासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या गुंडासह त्याचा साथीदार गजाआड; दत्तवाडी पोलिसांची म्हात्रे पूल परिसरात कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | परिसरात दहशत पसरवण्यासाठी पिस्तुल (Pistol) बाळगणाऱ्या गुन्हेगाराला (Pune Criminals) आणि त्याच्या साथिदाराला दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi police) अटक (Arrest) केली आहे. त्यांच्याकडून पिस्टल आणि काडतूस (Cartridge) जप्त करण्यात आले आहे. दत्तवाडी पोलिसांनी म्हात्रे पूल (Mhatre Bridge) परिसरात सापळा रचून ही कारवाई केली. रफिख उर्फ बबलु नबीलाल शेख Rafiq alias Bablu Nabilal Sheikh (वय – 31 रा. दत्तवाडी), प्रमोद उर्फ कमलेश कैलास घारे Pramod alias Kamlesh Kailas Ghare (वय – 31 रा. दांडेकर पूल – Dandekar Bridge) अशी अटक करण्यात आलेल्या (Pune Crime) आरोपींची नावे आहेत. (Pune Police)

 

परिसरात दहशत माजवण्यासाठी पिस्तुल घेऊन दोन जण उभारले असल्याची माहिती दत्तवाडी पोलीस ठाण्यातील (Dattawadi Police Station) पोलीस हवालदार शिवाजी क्षीरसागर (Police constables Shivaji Kshirsagar) आणि कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांना मिळाली. त्यानुसार दत्तवाडी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी म्हात्रे पूल परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्तुल आणि जिवंत काडतुस आढळून आले. पोलिसांनी पिस्तुल आणि काडतुस जप्त करुन आरोपींना अटक केली. (Pune Crime)

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior Police Inspector Abhay Mahajan), पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे (Police Inspector Vijay Khomane) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार (PSI Swapnil Lohar), चंद्रकांत कामठे (PSI Chandrakant Kamthe), राजू जाधव, प्रकाश मरगजे, अमित सुर्वे, दयानंद तेलंगे पाटील यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Dattawadi Police Arrest Criminals Near Mhatre Bridge area

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा