Pune Crime | अपघात झाल्याचे सांगून लुटणारी टोळी दत्तवाडी पोलिसांकडून गजाआड, 4 गुन्हे उघडकीस
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तुझ्याकडून मागे दोन अपघात (Accident) झाले आहे. त्या अपघाताची नुकसान भरपाई म्हणून 40 हजार रुपये दे असे म्हणत तीन चोरट्यांनी एका तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून (Looted by Threatening) लुटले. ही घटना (Pune Crime) शनिवारी (दि.10) रात्री दहा ते अकरा या दरम्यान पुणे सातारा रोड (Pune Satara Road) आणि लक्ष्मीनारायण थिएटर जवळ (Laxminarayan Theatre) घडली. याबाबत केतनकुमार वसंतराव होवाळ (वय-30 रा. शोभा निवास, संतोषनगर, कात्रज, मुळ रा. कराड जि. सातारा) याने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) रविवारी (दि.11) तक्रार केली आहे.
फिर्यादी हे कामावरुन घरी जात असताना त्यांच्या पाठिमागून दुचाकीवरुन आलेल्या टोळक्याने त्यांना आडवले. तुझ्यामुळे मागे दोन अपघात झाले आहेत. अपघाताची भरपाई म्हणून चाळीस हजार रुपये दे, नाहीतर तुझ आयुष्य उध्वस्त करेन, तु प्रॉपर पुण्याचा दिसत नाही, अशी धमकी चोरट्यांनी दिली. चोरट्यांनी फिर्यादी यांना धमकावून त्यांच्या मित्राकडून ऑनलाइन 40 हजार रुपये ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपींनी एटीएममधून 20 हजार रुपये काढून घेतले. तर 20 हजार रुपये जबरदस्तीने आरोपीच्या फोन पे अकाउंटवर जमा करुन घेतले. (Pune Crime)
आरोपींच्या शोधासाठी चार पथके
या गुन्ह्यातील आरोपींचा शोध तपास घेण्यासाठी दत्तवाडी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली होती. आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हे हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगार असून कामठेवस्ती माळवाडी मांजरी भागात लपल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून तीन जणांना अटक (Arrest) केली. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. इरफान इस्माईल सय्यद (वय-30 रा. माळवाडी, हडपसर), शरद उर्फ डॅनी रावसाहेब आहिरे (वय-26 रा. चांदे रोड, पुणे), सविता लक्ष्मण खांडेकर (रा. मांजरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपीच्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा
आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींच्या बँक खात्याची माहिती घेतली असता आरोपी इरफान सय्यद याच्या बँक खात्यात मागील एक वर्षात नऊ लाख रुपये वेगवेगळ्या युपीआय अकाउंटवरून (UPI account) जमा झाले आहेत. आरोपीच्या बँक खात्यावर 40 जणांनी पैसे जमा केल्याचे तपासात समोर आले आहे. या टोळीने हडपसर (Hadapsar), शिवाजीनगर (Shivajinagar), बंडगार्डन (Bundgarden), विश्रामबाग (Vishrambag), वानवडी (Wanwadi), हडपसर (Hadapsar), मुंढवा (Mundhwa) आणि पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. त्यापैकी हडपसर, शिवाजीनगर, बंडगार्डन, दत्तवाडी पोलीस ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपींची गुन्ह्याची पद्धत
आरोपी इरफान सय्यद व शरद उर्फ डॅनी अहिरे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर दरोडा (Robbery), जबरी चोरी, खुन (Murder), खुनाचा प्रयत्न (Attempted Murder) असे गंभीर गुन्हे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत. आरोपी रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकाला अडवून तुमच्याकडून मागे अपघात झाल्याची सांगून जखमीच्या उपचारासाठी व गाडीचे नुकसान भारपाई साठी जबरदस्तीने मारहाण करुन पैसे घेत होते. तसेच सार्वजनिक बाथरुमध्ये एकट्या नागरिकास हेरुन त्याच्यासोबत अश्लील चाळे करुन व्हिडिओ रेकॉर्डिगं करत होते. तसेच पोलिसांकडे जाण्याची धमकी देऊन पैसे घेत असल्याचे तपासात समोर आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे (PSI Chandrakant Kamthe) करत आहेत.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
आरोपीचे बँक खाते गोठवण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरु केली आहे.
आरोपींच्या बँक खात्यात पैसे जमा करणाऱ्या नागरिकांची माहिती घेतली जात आहे.
अशा प्रकारे जर कोणाकडून जबरदस्तीने पैसे घेतले असतील तर त्या नागरिकांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात
संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन
(Senior Police Inspector Abhay Mahajan) यांनी केले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम) राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 सुहैल शर्मा (DCP Suhail Sharma), सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार
(ACP Sunil Pawar), वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे
पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, प्रशांत शिंदे, किशोर वळे, दयानंद तेलंगे-पाटील,
सद्दाम शेख्खू, रेवणनाथ जाधव, प्रकाश मरगजे, अमित सुर्वे, पुरुषोत्तम गुन्ला, अमोल दबडे, अनिस तांबोळी,
प्रमोद भोसले, नवनाथ भोसले, ज्ञानेश्वर शिंदे, अमित चिव्हे यांच्या पथकाने केली.
Web Title :- Pune Crime | Dattwadi Police nabs gang robbing by pretending to be accident, 4 crimes revealed
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Shreyas Iyer | आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रेयसचा बोलबाला; सूर्यकुमारलाही टाकले मागे
Pune Crime | ‘माझ्यासोबत रिलेशन ठेव अन्यथा…’ भर रस्त्यात धमकी देत तरुणीचा विनयभंग; पुण्यातील घटना