क्राईम स्टोरीपुणे

Pune Crime | प्रॉपर्टीसाठी 32 वर्षाच्या सुनेकडून 75 वर्षांच्या सासर्‍याला बेदम मारहाण; चंदननगर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मालमत्तेच्या वादातून अनेक घरात वादावादी, भांडणे (Property Dispute) सुरु असल्याचे दिसून येते. मात्र, चंदननगरमध्ये एका ३२ वर्षाच्या सुनेने (Daughter In Law) प्रॉपर्टीच्या वादातून आपल्या ७५ वर्षांच्या सासर्‍याला (Father In Law) फरशी पुसण्याच्या पोच्याच्या दांडीने मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी चंदननगरमधील ७५ वर्षाच्या वृद्ध नागरिकाने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी सोनाली अनिलकुमार जगताप Sonali Anilkumar Jagtap (वय ३२, रा. चंदननगर) हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी सकाळी ८ वाजता घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिला ही फिर्यादी यांची सून आहे.
फिर्यादी यांची पत्नी नातवंडांना दुध गरम करत असताना सोनाली हिने फरशी पुसण्याच्या पोच्याच्या नळीने फिर्यादी यांच्या पाठीवर व हाताच्या तळव्यावर मारुन जखमी केले.
तसेच हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली. तुम्ही मला प्रॉपर्टी कशी देत नाही, तेच बघते अशी धमकी दिली.
सूनेच्या धमकीमुळे घाबरुन गेलेल्या वृद्ध आजोबांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक कुमरे अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Daughter In Law and Father In Law Property Dispute Incidents in Chandan Nagar Police Station Limits

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


 

 

Back to top button