Pune Crime | हातावरील गोंदलेला ओम अन् चप्पलने फुटली खूनाचा वाचा; दौंडमधील एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – Pune Crime | दौंड येथील वन खात्याच्या जमिनीत (Daund Forest Land) एका तरुणाचा चेहरा विद्रुप केलेल्या अवस्थेतील मृतदेह (Dead Body Found In Daund) आढळून आला होता. या तरुणाच्या हातावर अश्विनी असे नाव व त्रिशुल ओम गोंदलेले होते. तसेच मृतदेहाजवळ पोलिसांना चप्पल आणि दुचाकीची चावी आढळून आली. यावरुन खूनाच्या गुन्ह्याला (Murder In Pune) वाचा फोडण्यात पोलिसांना यश आले. (Pune Crime)

राजेंद्र शिंदे (वय ३४, रा़ गवळीवाडा, दौंड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिंदे याच्या खूनाच्या आरोपावरुन पोलिसांनी उमेश गुरबळआप्पा बनजगोल (वय ५२, रा. गजानन सोसायटी, दौंड) याला अटक करण्यात आली आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड पोलिसांना वन खात्याच्या हद्दीत २५ मार्च २०२२ रोजी एक मृतदेह आढळून आला होता. त्याचा चेहरा विद्रुप करण्यात आला होता. त्यामुळे त्याची ओळख पटू शकत नाही. मृतदेहाजवळ चप्पल व चावी पडलेली पोलिसांना मिळाली. या व्यक्तीच्या हातावर अश्विनी तसेच त्रिशूल व ओम गोंदलेले होते. परंतु, त्यांची ओळख पटू शकली नाही. त्यानंतर काही दिवसांनी शिंदे यांची आई सत्यभामा या मुलगा हरविला असल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्या होत्या. ओळख न पटल्याने तोपर्यंत पोलिसांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते.

मृतदेहावरील गोंदलेली नावे व तेथे सापडलेली चप्पल, चावी या वस्तू सत्यभामा बाई यांनी ओळखल्या व त्या आपला मुलगा राजेंद्र शिंदे याच्या असल्याचे सांगितले. मृतदेहाची ओळख पडल्यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली.
तेव्हा राजेंद्र शिंदे व त्याची पत्नी एका ठिकाणी मोलमजुरीसाठी जात होते.
तेथे त्याच्या पत्नीचे उमेश बनजगोल याच्याबरोबर संबंध निर्माण झाल्याचा राजेंद्र याला संशय होता.
त्यातून त्यांच्यात वादावादी होत होती. राजेंद्र याचा कायमचा काटा काढण्यासाठी उमेश याने त्यांला दारु पाजण्यासाठी वन खात्याच्या हद्दीत नेले.
तेथे त्याला दारु पाजून त्यांचा खून केला. त्याची ओळख पटू नये, म्हणून त्याचा चेहरा विद्रुप केला.
मात्र, पोलीस निरीक्षक विनोद घुगे (Police Inspector Vinod Ghuge) व त्यांच्या सहकार्‍यांनी केलेल्या
तपासामुळे व त्याच्या अंगावरील गोंदलेल्या खुणांवर खूनाचा वाचा फुटली.

 

Web Title : Pune Crime | Daund Murder Case Police Arrest One

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bharti Singh Good News | सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, दिला गोंडस बाळाला जन्म..!

 

Retired DySP Dilip Shinde Passes Away | निवृत्त पोलीस उप अधीक्षक दिलीप शिंदे यांचे पुण्यात निधन

 

Neetu Singh Kapoor Viral Dance Video | वयाच्या 63 व्या वर्षी नितू कपूरनं दिली चक्क नोरा फतेहीला टक्कर,
डान्स पाहून तुम्हीही होताल थक्क !