Pune Crime | ‘खंडणी नाही तर दिली तर त्याच मातीत गाडून टाकेल’ म्हणणार्‍या सामाजिक कार्यकर्त्याला अटक

पुणे : Pune Crime | तुम्हाला मुरुम, माती उपसा करुन वाहतूक करायची असेल तर मला पैसे द्यावे लागतील, नाही तर त्याच माती गाडून टाकण्याची धमकी देऊन खंडणी (extortion) उकळणार्‍या (Pune Crime) कथित सामाजिक कार्यकर्त्याला दौंड पोलिसांनी अटक केली आहे. राजेश पांडुरंग लाड Rajesh Pandurang Lad (रा. पाटस, ता. दौंड Daund) असे या खंडणीखोर सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे.

याप्रकरणी अकुंश रामचंद्र वणवे (वय ३८, रा. अंबिकानगर, पाटस) यांनी दौंड पोलिसांकडे (Daund police) फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे हेमंत जाधव यांच्या घरासमोर मोकळ्या जागेत त्यांचा मुरमाने भरलेला टिपर चालक संतोष भुजबळ हा खाली करीत होता. त्यावेळी राजेश लाड याने दमदाटी करुन त्याला टिपरमधील मुरुम मोकळया जागेत खाली करायला भाग पाडून त्याचे मोबाईलवर फोटो काढले. हे समजल्यावर फिर्यादी हे तेथे आले. तेव्हा लाड याने फिर्यादी यांना तु मला एक लाख रुपये दिले तर मी तुझ्या वाहनाबाबत पुढे तक्रार करणार नाही. नाहीतर तुझा टिपर मुरुमावर करा चालतो ते पहातो, असे म्हणून दमदाटी केली.

Pune Crime | daund police arrest rajesh pandurang lad in extortion case

त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांच्या व्यवसायातील मित्रांना त्या ठिकाणी बोलावून घेतले. तेव्हा
त्यांच्यापैकी राजेंद्र रामदास घाडगे यांनी सांगितले की, २० दिवसांपूर्वी माझ्याही ट्रॅक्टरचे असेच रोटी
या ठिकाणी फोटो काढून बेटवाडी येथे बोलावून २० हजार रुपये घेतले होते, असे त्यांनी सांगितले़.
त्यावेळी त्याने याबाबत कोठे वाच्यता केल्यास मी सामाजिक कार्यकर्ता आहे. तुम्ही मुरुम काढणार्‍या
लोकांना मातीत गाडून टाकीन अशी धमकी दिली होती. त्यानंतर त्यांनी दौंड पोलिसांकडे (Daund Police) धाव घेतली. पोलिसांनी राजेंद्र लाड याला अटक केली आहे.
पाटस, दौंड परिसरात राजेश लाड याने सामाजिक कार्यकता असल्याचे सांगत धमकी देऊन अनेकांकडून खंडणी (extortion) उकळली असल्याच्या अनेक तक्रारी आहेत़ त्याच्याविरुद्ध काही महिन्यांपूर्वी यवत पोलीस ठाण्यात खंडणी व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

हे देखील वाचा

Porn Film Case | राज कुंद्राची HotHit मधून दररोज होत होती ‘इतक्या’ लाखांची कमाई, पहा बँक डिटेल्स

Rashtrawadi Jeevlag | कोरोनातील अनाथांसाठी ‘राष्ट्रवादी जीवलग’ योजना, अजितदादांच्या वाढदिवसादिवशी योजना सुरु, सुप्रिया सुळेंची दिल्लीतून घोषणा (व्हिडिओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | daund police arrest rajesh pandurang lad in extortion case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update