Pune Crime | पुण्याच्या मंचरमध्ये दिवसाढवळ्या सराईतावर गोळीबार ! ओंकार उर्फ राण्याचा खात्मा, परिसरात खळबळ

पुणे / मंचर : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime | पुणे ग्रामीणमधील (Pune Crime) मंचर (Manchar) येथे दिवसाढवळ्या एका तरुणाचा गोळ्या घालून (firing) खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज (रविवार) दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच मंचर पोलीस ठाण्यातील (Manchar Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार उर्फ राण्या बाणखिले (रा. बाणखिले मळा, मंचर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. राण्या बाणखिले हा सराईत गुन्हेगार आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घटनेची माहिती मिळताच मंचर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे.

हा खून कोणी केला हे अद्याप समजू शकले नाही. आरोपीचा शोध घेतला जात असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येत आहे.

मंचरमध्ये गोळीबाराची घटना झाल्याची माहिती पुणे ग्रामीणमधील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

 

Web Tital :Pune Crime | Daytime firing at Pune’s Manchar! The demise of Omkar alias Rana bankhile, the excitement in the area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Pune News | पुणे शहर काँग्रेसचे कार्यालय सचिव उत्तम भूमकर यांचे काँग्रेस भवनात ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

Pune Crime | पुण्यातील नांदेड सिटीमध्ये नॅशनल हॉर्स रायडर असलेल्या 17 वर्षीय श्रीया पुरंदरेची आत्महत्या, प्रचंड खळबळ

ICICI Bank ने आजपासून केला मोठा बदल, ग्राहकांना खर्च करावे लागतील जास्त पैसे; जाणून घ्या