Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार रोहन जगताप 6 महिन्यांसाठी तडीपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरातील बिबवेवाडी (Bibvewadi Police Station) व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारावर तडीपारीची (Tadipar Criminal) कारवाई करण्यात (Pune Crime) आली आहे. परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांनी ही कारवाई केली आहे. रोहन राजन जगताप Rohan Rajan Jagtap (वय – 21 रा. काकडेवस्ती, कोंढवा बुद्रुक, पुणे) असे तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

 

बिबवेवाडी व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवत आणि लोकांना दमदाटी करुन लुटणाऱ्या रोहन जगतापची दहशत वाढत चालली होती. सर्वसामान्य लोकांना वेठिस धरणाऱ्या जगतापवर प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र, त्याच्यावर कोणताही परिणाम झाला (Pune Crime) नाही. त्याने पुन्हा शरिराविरुद्धचे गुन्हे केले. त्यामुळे बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे (Senior Police Inspector Vilas Sonde), पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर (Police Inspector Anita Hivarkar) यांनी जगताप याच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande) यांच्या मार्फत पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे सादर करण्यात आला.

प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करुन रोहन जगताप याच्यावर तडीपारीची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
रोहन जगताप हा तडीपार कालावधीमध्ये तडीपारी आदेशाचा भंग करुन पुणे शहरात (Pune City) किंवा बिबवेवाडी परिसरात दिसून आल्यास तात्काळ बिबवेवाडी पोलीस स्टेशन किंवा पुणे पोलीस नियंत्रण कक्ष (Pune Police Control Room) येथे माहिती द्यावी असे आवाहन बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी नागरिकांना केले आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | dcp namrata patil expelled out history sheeter rohan jagtap of pune district

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा