Pune Crime | कोल्ड्रिंक पिणे बेतले जीवावर ! कंटेनरच्या धडकेत नवोदित डॉक्टर तरुणाचा मृत्यू; पुण्यातील दुर्दैवी घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मित्राच्या लग्नासाठी (Wedding) रस्त्याच्या कडेने पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरची धडक (Container) बसली. यामध्ये नुकताच डॉक्टर झालेल्या तरूणाचा (Young Doctor) दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. त्याचे अधिकारी होण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. अजिंक्य मोहन सांगळे Ajinkya Mohan Sangale (वय – 26 रा. सिंहगड रोड -Sinhagad Road, पुणे) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर मोहित मधुकर घोलप Mohit Madhukar Gholap (वय – 25 रा. डी. पी. रोड, माळवाडी) हा गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना गुरुवारी (दि.26) दुपारी सव्वा दोनच्या (Pune Crime ) सुमारास घडली.

 

मोहित घोलप हा आर्कीटेक्ट (Architect) असून तो मित्राच्या लग्नासाठी अहमदाबाद येथून आला होता. त्याच्यावर एका खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) अज्ञात कंटनेर चालकाविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

अपघातातील (Accident) मृत अजिंक्य याचा मागील आठवड्यात बीडीएसचा (BDS) निकाल लागला होता. यामध्ये तो पास होऊन डॉक्टर झाला. एकाच कॉलनीत आयुष्य घालवलेल्या एका मित्राच्या लग्नासाठी तो आपल्या इतर मित्रांसह आला होता. कुंजीरवाडी (Kunjirwadi) येथील गोविंद सागर मंगल कार्यालयात हा विवाह सोहळा होता. धिरज काळे (Dheeraj Kale) आणि आशिष उबाळे (Ashish Ubale) हे अगोदर लग्नस्थळी पोहचले. त्यानंतर अजिंक्य आणि मोहित हे मंडपात आले.

अधिकारी व्हायचं स्वप्न अपूर्ण राहिले…
मोहित त्याचे अहमदाबाद येथील आर्कीटेकचे काम उरकून घाई घाईने पुण्यात मित्राच्या लग्नाला आला होता. या लग्नामध्ये चौघे मित्र एकत्र आल्याने त्यांच्यामध्ये गप्पांची मैफिल रंगली. यावेळी बोलताना अजिंक्यने युपीएससीची परीक्षा (UPSC Exam) देऊन अधिकारी व्हायचे असल्याचे मित्रांना सांगितले. गप्पा संपल्यानंतर कोल्ड्रींक (Cold drink) पिण्यासाठी ते सोलापूर रस्ता (Solapur Road) क्रॉस करुन रस्त्याच्या पलिकडे गेले. मंगल कार्यालयात येण्यासाठी त्यांनी पुन्हा रस्ता क्रॉस केला. त्यावेळी धीरज आणि आशिष हे पुढे रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीतून चालले होते. त्यांच्या मागे अजिंक्य आणि मोहित चालत होते. काही समजण्याच्या आतच भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने त्या दोघांना उडवले.

 

कोणीच मदतीला धावले नाही
अजिंक्य आणि मोहित यांना भरधाव कंटेनरने उडवल्याचे धिरज आणि आशिष यांनी पाहिले.
त्या दोघांनी लगेच मदतीसाठी धाव घेतली, मात्र अजिंक्यचा जागीच मृत्यू झाला होता.
तर मोहित गंभीर जखमी झाल्याचे दिसले. त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांकडे मदतीसाठी विनवणी केली.
मात्र कोणीच त्यांच्या मदतीला आले नाही.
मात्र, धिरजने आपल्या सोबत आणलेल्या करमधून लगेच मोहितला लोणी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
याबाबत कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कंटेनर चालकाचा शोध घेत आहेत.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोरे (PSI Gore) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Death of a young doctor in a container collision The unfortunate incident in Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा