Pune Crime | दुर्दैवी ! भाजीपाला विक्री करुन घरी परतणाऱ्या मायलेकरावर काळाचा घाला, कंटेनरखाली दबून दोघांचा मृत्यू

पुणे / शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) शिरुरच्या मार्केटमध्ये कांदा व भाजीपाला विक्री करुन पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी (Raleganasiddhi) येथे घरी परतणाऱ्या मायलेकरावर काळाने घाला घातला. पुणे-नगर रस्त्यावर (Pune-Nagar Highway) गव्हाणवाडी हद्दीत भरधाव वेगातील कंटेनर दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला जाऊन पलटी झाला. या कंटेनरखाली चिरडून या मायलेकराचा मृत्यू (Pune Crime) झाला. ही घटना रविवारी (दि.17) पहाटे साडेसहाच्या सुमारास घडली.

 

स्वप्निल उर्फ बंडू बाळू मापारी Swapnil alias Bandu Balu Mapari (वय-27) व लक्ष्मीबाई बाळू मापारी Lakshmibai Balu Mapari (वय-62 दोघे रा. राळेगणसिद्धी, ता. पारनेर, जि. नगर) अशी अपघातात मृत्यू झालेल्या मायलेकरांची नावे आहेत. ते दोघे शिरुरच्या मार्केट यार्डमध्ये (Shirur Market Yard) आज सकाळी कांदा व भाजीपाला विक्रीसाठी घेऊन आले होते. घाऊक विक्रेत्यांना मला विक्रीकरुन साडेसहाच्या सुमारास ते दुचाकीवरुन घरी जात होते.

 

शिरुर शहरापासून तीन किमी अंतरावर गव्हाणवाडी नजीक ते गेले असताना नगरहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा कंटेनर (एमएच 22 जी 5145) दुचाकीवर उलटला. त्या खाली चिरडून या मायलेकराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.

अपघाताची माहिती मिळताच बेलवंडी पोलिसांनी (Belwandi police) अपघाताची नोंद केली.
कंटेनर चालकावर गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ (Police Inspector Nandkumar Dudhal),
पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे (PSI Prakash Borade) यांच्यासह पोलीस हवालदार संतोष औटी,
मारुती कोळपे, भाऊसाहेब शिंदे संपत गुंड या पथकाने घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली.

 

अर्ध्यावर संसार मोडला
मयत स्वप्नील याचा दीड वर्षापूर्वी विवाह झाला होता. सुखी संसाराचा डाव अर्ध्यावर मोडला.
नेहमी कष्ट करणारे मापारी कुटुंबातील स्वप्नील व त्याची आई यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण राळेगणसिद्धी गावावर शोककळा पसरली आहे.

 

Web Title :- Pune Crime | death of mother and son in accident shirur of pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amazon च्या ‘सीक्रेट’ वेबसाइटवरून करा खरेदी, अर्ध्यापेक्षा कमी किमतीत मिळत आहेत प्रॉडक्ट, सणांमध्ये होईल मोठी बचत

Nagpur Crime | लग्नाचे आमिष दाखवून उच्चशिक्षीत तरुणीसोबत शरिरसंबंध, दगाबाजी करणाऱ्या पुण्यातील अभियंत्यावर FIR

Money Transfer In Wrong Account | चुकीच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर झालेत? मग जाणून घ्या परत मिळविण्याची पध्दत; आरबीआयनं बनवलेत काही नियम