Pune Crime | धक्कादायक ! उपचारांमध्ये निष्काळजीपणा केल्याने शिक्षिकेचा मृत्यू; पोलीस पतीच्या तक्रारीवरून डॉक्टरवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील वाकड परिसरातील (Wakad Area) एक धक्कादायक घटना (Pune Crime) समोर आली आहे. आजाराचे योग्य निदान न करता मनाला वाटेल तसे उपचार केले. उपचारांमध्ये निष्काळजीपणामुळे पोलिसाची पत्नी असलेल्या शिक्षिकेचा मृत्यू (Died) झाला आहे. याप्रकरणी डॉक्टरच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. मंजुषा संतोष भागवत (Manjusha Santosh Bhagwat) (वय 43) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. ही घटवा लाईफ लाईन क्लिनिक (Life Line Clinic), मेन रोड वाकड, विशाल नगर, जगताप डेअरी येथे 1 ते 3 सप्टेंबर 2018 या कालावधीत घडली.

संतोष तुकाराम भागवत (Santosh Tukaram Bhagwat) (वय 48, रा. गुलमोहर कॉलनी, विशालनगर, जगताप डेअरी, औंध -वाकड रोड, पुणे) यांनी या प्रकरणी रविवारी (10 एप्रिल) रोजी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून डॉ. प्रदीप एच. पाटील (Dr. Pradeep H. Patil) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

याबाब माहिती अशी की, फिर्यादी संतोष भागवत हे पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या (Pimpri-Chinchwad Police Commissionerate) विशेष शाखेत पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांची पत्नी मंजुषा यांची तब्येत खराब झाल्याने त्यांना 1 सप्टेंबर 2018 रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी मंजुषा यांना न्युमोनिया झालेला असताना डॉ. प्रदीप पाटील याने आजाराचे योग्य प्रकारे निदान केले नाही. निष्काळजीपणाने फक्त रक्ताची तपासणी करून प्लेटलेट्स कमी झाल्याचा निष्कर्ष काढला. त्याचबरोबर मनाला वाटेल त्या पद्धतीने उपचार केले. त्यानंतर 4 सप्टेंबर 2018 रोजी मंजुषा यांची प्रकृती जादा बिघडली. त्यामुळे संतोष भागवत यांनी पुढील उपचारासाठी थेरगाव येथील रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान मंजुषा यांचा 5 सप्टेंबर 2018 रोजी मृत्यू झाला.

दरम्यान, न्युमोनियाच्या आजाराने मंजुषा यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, फिर्यादी संतोष भागवत यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यांच्या अर्जावरून चौकशी करून पोलिसांनी याप्रकरणी साडेतीन वर्षांनंतर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे PSI Sangeeta Gode) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | death of woman teacher due to improper treatment
crime against doctor on complaint of police husband

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakhi Sawant Viral Video | पार्टीमध्ये अत्यंत शॉर्ट ड्रेस घालून राखी सावंतने दिल्या अशा पोज,
व्हायरल व्हिडिओनं वाढवला सोशल मीडियाचा पारा…

 

Tina Datta Stylish Look | स्टाईलिश साडी नेसून टीना दत्तानं केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले घायाळ…!

 

Priyanka Chopra Traditional Look | प्रियंका चोप्रानं पारंपारिक ड्रेस घालून दाखवला ग्लॅमरस अंदाज, फोटोतील देसी लूक पाहून नेटकरी गेले मोहून