Pune Crime | धक्कादायक ! मित्राच्या पत्नीसोबत अश्लील फोटो एडिट करून बदनामी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पिंपरी परिसरातील एक धक्कादायक घटना (Pune Crime) समोर आली आहे. मित्राच्या पत्नीसोबत अश्लील फोटो (Pornographic Photos) एडिट करून व्हाट्सअपवर पाठवून बदनामी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याचबरोबर पैसे दिले नाही तर फोटो आणखी व्हायरल करण्याचीही धमकी दिली आहे. हा प्रकार देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 ते 24 जानेवारी 2022 रोजी या कालावधीत घडला. याप्रकरणी 39 वर्षीय व्यक्तीने सोमवारी देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehu Road Police Station) फिर्याद दिली. यानूसार पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, फिर्यादीच्या मोबाईलवर आरोपीने वेळोवेळी फोन करून 3 ते 5 हजार रुपयांची मागणी केली. यानंतर फिर्यादीने पैसे दिले नाहीत. त्यामुळे आरोपीने फिर्यादीच्या मित्राची पत्नी आणि फिर्यादी यांचा अश्लील फोटो एडिट केला आहे. फिर्यादीच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील 15 नंबर वरील व्हाट्सअपवर एडिट केलेला फोटो पाठवून आरोपीने बदनामी केली आहे. पैसे दिले नाहीत तर मी अजून तुमच्या मित्रांना तुमचे फोटो व्हायरल करील, अशी धमकी देखील आरोपीने दिली आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी फिर्यादी व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार खंडणी / आयटी ॲक्ट अन्वये देहूरोड पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे (Police Inspector (Crime) Rajendra Nikalje) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | defamation by editing obscene photos with a friends wife dehuroad police

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा