Pune Crime | आंबेगाव पठार येथील 23 वर्षीय तरुणीचे अश्लील फोटो मॉर्फ करुन बदनामी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ऑनलाईन कर्ज (Online Loan) दिल्यानंतर ते व्याजासह फेडले तरी त्यासाठी घेतलेले फोटो मॉर्फ (Photo Morphing) करुन तसेच अश्लील फोटो (Pornographic Photos) पाठविण्याची धमकी (Threat) देऊन खंडणी (Ransom) मागण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. एका तरुणीने कर्ज फेडल्यानंतरही तिच्या नातेवाईकांना अश्लील फोटो मॉर्फ स्वरुपात पाठवून बदनामी केल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) समोर आला आहे. (Pune Cyber Crime)

 

याप्रकरणी आंबेगाव पठार (Ambegaon Pathar) येथील एका 23 वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी ऑनलाईन लिंकवर क्लिक करुन कर्ज घेतले होते. त्याचे मुद्दल व व्याज त्यांना ऑनलाईन परत केले होते. असे असताना त्यांच्या मोबाईलवर पैसे भरण्याची मागणी करुन शिवीगाळ केली जात होती. तसेच त्यांच्या नातेवाईकांनाही शिवीगाळ करुन मारण्याची धमकी (Threatening to Kill) दिली जात होती. त्यांचे अश्लील फोटो मॉर्फ स्वरुपात नातेवाईकांना पाठवून बदनामीकारक मेसेज पाठवून बदनामी केली. तसेच कर्ज भरणासाठी पैशांची मागणी करीत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यादव (Police Inspector Yadav) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Defamation by morphing obscene photos of 23 year old girl from Ambegaon Pathar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा