क्राईम स्टोरीपुणे

Pune Crime | बनावट फेसबुक अकाऊंटवर महिलेची बदनामी अन् आत्महत्येची धमकी; बलात्काराच्या गुन्ह्यानंतरही महिलेला देतोय त्रास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जबरदस्तीने शारीरीक संबंध (Physical Relation) ठेवून बलात्कार केल्याच्या प्रकरणात अटकेनंतर जामिनावर सुटून आलेला आरोपी संबंधित महिलेला तिच्या घरी जाऊन त्रास देत असून बनावट फेसबुक अकाऊंट (Fake Facebook Account) तयार करुन त्यावर या महिलेची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime) याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) समीर बाळू निकम Sameer Balu Nikam (रा. जिजाऊ बिल्डींग, नर्‍हेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी एका ३१ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलिसांकडे (Kondhwa Police) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने समीर निकम याच्याविरुद्ध मारहाण करुन बलात्कार केल्याची फिर्याद दिली होती. त्या गुन्ह्यात समीर याला अटक झाली होती. त्यातून तो जामिनावर सुटून बाहेर आल्यानंतर डिसेंबर २०२१ पासून तो पुन्हा या महिलेला त्रास देऊ लागला. फिर्यादी रहात असलेल्या ठिकाणी येऊन तुझा मुलगा माझा आहे. तो मला दे, नाही तर मी कोणत्याही थराला जाऊ शकतो, अशी धमकी दिली. त्याकडे या महिलेने दुर्लक्ष केल्यावर त्याने या महिलेच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले.

कोंढवा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीशी संबंधित असलेला बदनामीकारक मजकूर फेक फेसबुक अकाऊंटवर टाकला. तसेच त्या अकाऊंटवरुन या महिलेच्या नातेवाईक व इतरांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यावर अश्लिल शेरेबाजी करुन या महिलेची बदनामी केली. या महिलेच्या मित्रमैत्रिणीला फोन करुन तिची बदनामी (Pune Crime) केली. पतीचा पाठलाग करुन त्यांना ‘‘मी आता तुमची इज्जत घालवून टाकणार आणि तुझ्या पत्नीला मारुन टाकणार आहे. जर तुम्हाला हे सर्व थांबवायचे असेल तर तुम्हाला एकच ऑप्शन आहे. तुम्ही मला मारुन टाका. नाही तर मी स्वत:च आत्महत्या करतो आणि तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून तुम्हाला अडकून टाकणार. मी तुम्हाला त्रास देणार आणि तुमची बदनामी करणार’’ अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Defamation of a woman on a fake Facebook account and death threats; He is harassing women even after the crime of rape Kondhwa Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्च

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…

AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्या

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Back to top button