Pune Crime | विवाह झाल्याची बनावट कागदपत्रे तयार करुन ती सोशल मीडियावर व्हायरल करुन तरुणीची बदनामी; चंदननगरमध्ये दोघांविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | विवाह झाला नसतानाही विवाह झाला असल्याची बनावट कागदपत्रे (Fake Document) तयार करुन ती समाजातील विविध मॅरेज ग्रुपवर (Marriage Group) टाकून तरुणीची बदनामी (Defamation) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी खराडी (kharadi) येथे राहणार्‍या एका २३ वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २६८/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी इम्रान समीर शेख (Imran Sameer Sheikh) (रा. विकासनगर, घोरपडी) आणि शेख खलील शेख जलील Sheikh Khalil Sheikh Jalil (रा. इस्मालपुरा, अमदापूर, बुलढाणा – Buldhana) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे. हा प्रकार १८ जुलै रोजी घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
इम्रान शेख याने शेख जलील यांच्या मदतीने फिर्यादी यांची व त्यांच्या कुटुंबियांची समाजामध्ये बदनामी व्हावी,
या उद्देशाने हा सर्व प्रकार केला आहे.
फिर्यादी यांचा विवाह कोणाशीही झालेला नसल्याचे माहिती असतानाही त्या दोघांनी फिर्यादी यांचा इम्रान शेख याच्याशी विवाह झाल्याचे दाखविणारे फोटो, नाव टाकून, खोटी सही, अंगठा असलेले खोटे व बनावट मॅरेज सर्टिफिकेट (Fake Marriage Certificate)
तसेच निकाहनामा फॉर्म (Nikahnama Form) तयार केला.
तो खरा असल्याचे व त्यांच्या समाजातील लोकांना कळावे,
यासाठी समाजातील विविध मॅरेज ग्रुपवरील व्हॉटसअपवर मॅरेज सर्टिफिकेट व निकाहनामा टाकून फिर्यादी यांचे इम्रान शेख याच्याशी विवाह झाल्याचे दाखवून बदनामी केली.
सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे (Assistant Police Inspector Sonwane) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Defamation of the young woman by creating fake marriage documents and
making them viral on social media Crime against two in Chandannagar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा