Pune Crime | पुण्यात डिलीव्हरी बॉयनं पार्सल घेणार्‍या 23 वर्षीय तरूणीला पाहून थेट केलं ‘हस्तमैथुन’, कोंढवा-उंड्रीतील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime | सध्या जवळपास सर्वच जण काही ना काही ऑनलाईन वस्तू मागवत असतात. त्याची डिलिव्हरी देण्यासाठी डिलिव्हरी बॉय कधीही घरी येत असतात. अशाच एका घरात डिलिव्हरी बॉय (Delivery Boy)रात्री उशिरा डिलिव्हरी देण्यासाठी आला आणि घरात एका 23 वर्षीय तरुणीला पाहून त्याने आपल्या पॅटची चैन उघडून लज्जास्पद (Masturbation) कृत्य केले. (Pune Crime)

याप्रकरणी उंड्रीतील (Undri) एका २३ वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोमान्ना फॅशन्स इंडिया कंपनीच्या डिलिव्हरी बॉय सतिश केंधले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची माहिती अशी, फिर्यादी तरुणीने एक्से पॅरिस ब्रॅड व्हाया रोमान्ना फॅशन्स इंडिया या कंपनीची लॅपटॉप बॅग ऑर्डर केली होती. या लॅपटॉप बॅगची डिलिव्हरी करण्यासाठी १ डिसेबर रोजी रात्री पावणेदहा वाजता कंपनीचा डिलिव्हरी बॉय सतीश केंधले आला होता. त्याने आपल्या पँटची चैन उघडून लज्जास्पद कृत्य केले. त्याची माहिती झाल्यावर फिर्यादी यांच्या आईने त्याला फोन करुन जाब विचारला असता त्याने “मी कोणालाही घाबरत नाही, काय करायचे ते करा,” असे बोलून फिर्यादीच्या आईला धमकी (Pune Crime) दिली. फिर्यादी यांनी त्याची कंपनीकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता पोलिसांकडे तक्रार केल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दगडे तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Delivery Boy in Pune saw a 23 year old girl and did a masturbation Incidents in Kondhwa Undri area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

GST on Notice Period | आता नोकरीला ‘रामराम’ करणे देखील महागात पडणार,
नोटीस पिरियडसाठी भरावा लागेल GST

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस; जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस

Central Bank of India Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती; पगार 1 लाख रूपयांपर्यंत रुपये