Pune Crime | 5000 रूपयाच्या बदल्यात 38 वर्षीय महिलेकडे शरीरसुखाची मागणी; मैत्रिणीकडे केली बदनामी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | उसने पैसे दिल्याच्या बदल्यात एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी (Demand Of Physical Relationship) करुन तिची मैत्रिणीकडे बदनामी केल्याचा (Deformation Of Woman) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) एका ३८ वर्षाच्या महिलेने फिर्याद ( गु. रजि. नं. ६४/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दिलीप मरळ Dilip Maral Warje (रा. वारजे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Crime Against Woman)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कोथरुडमध्ये (Kothrud) रहायला आहेत. त्यांची दिलीप मरळ याच्याबरोबर ओळख आहे. फिर्यादी यांना गरज असल्याने मरळ याने त्यांना ५ हजार रुपये १ फेब्रुवारी २०२२ रोजी उसने दिले होते. त्यानंतर त्याने उसने पैसे दिल्याच्या बदल्यात त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी करु लागला (Pune Crime). त्याला त्यांनी विरोध केला. तेव्हा त्यांनी अपशब्द वापरुन फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच त्यांच्या मैत्रिणीकडे फिर्यादी यांच्याबरोबर आपले प्रेमसंबंध असल्याचे सांगून बदनामी केली. याची माहिती मिळाल्यावर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Demand for physical relation and body comfort from 38-year-old woman for Rs 5,000; Defamation done to a friend

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त