Advt.

Pune Crime | पुण्यात जादुटोणा करण्याची भिती दाखवून महिलेकडे शरीरसुखाची मागणी; भोंदूबाबाला वाकड पोलिसांकडून अटक

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जादूटोणा (Blackmagic) करण्याची भिती दाखवून एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील (Pune Crime) पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) वाकड पोलीस ठाण्याच्या (Wakad Police Station) हद्दीत उघडकीस आली असून पोलिसांनी भोंदूबाबाला डांगे चौकात सापळा रचून अटक (Arrest) केली. विलास बापूराव पवार उर्फ महाराज Vilas Bapurao Pawar alias Maharaj (वय-41 रा. मु.पो. पिंपळवंडी, ता. पाटोदा, जि. बिड) असे अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबाचे (Bhondubaba) नाव आहे.

याप्रकरणी काळेवाडी येथे राहणाऱ्या पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित महिलेला फोन करुन पतीने त्यांना पांगळे करण्यास सांगितले असून तुमच्यात होणारे भांडण याबाबत मला माहित असल्याचे सांगितले. तसेच महिलेच्या पोटात दोन ते ती गाठी असल्याचे सांगून आयुष्य थोडेसे राहिले आहे, असे सांगून महिलेला भीती दाखवून वारंवार फोन करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. (Pune Crime)

ज्या माणसाच्या उजव्या हाताचे तळहातावर व गुप्तांगावर तीळ आहे.
त्याच्याशी तुम्ही शारीरिक संबंध ठेवले तर तुम्हाला कोणीही काही करु शकणार नाही, असे आरोपीने पीडित महिलेला सांगितले.
त्यानंतर त्याने स्वत:चा एक अश्लिल व्हिडिओ (Pornographic Video) पाठवून त्यात उजव्या हातावरील तीळ व गुप्तांगावरचे तीळ दाखवले.
महिलेला व्हिडिओ पाठवल्यानंतर त्याने फोन करुन तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तसेच माझ्याशी शरीरसंबंध ठेवले तर तुमचे सगळे कुटूंब सुखी राहील. तुम्हाला तुमचे कुटुंब सुखी ठेवायचे असेल तर माझ्याशी शरीरसंबंध ठेवा असे म्हणत वारंवार शरीरसुखाची मागणी करुन महिलेचा विनयभंग (Molestation) केला.

घटनेचे गांभीर्य ओळखून वाकड पोलिसांनी महिलेशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने आरोपीला पकडण्यासाठी शनिवारी डांगे चौकात (Dange Chowk) सापळा रचला. आरोपीला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash), अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे (Addl CP Sanjay Shinde), पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 आनंद भोईटे (DCP Anand Bhoite), सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले (ACP Shrikant Disley)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर (Senior Police Inspector Dr. Vivek Mugalikar),
पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष पाटील (Police Inspector Santosh Patil), सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव (API Abhijeet Jadhav), पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगल (PSI Ganesh Torgal), पोलीस अंमलदार बिभीषण कन्हेरकर, दिपक साबळे, दिपक भोसले,
भास्कर भारती, कल्पेश पाटील यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime | Demand for physical relation form woman in Pune for fear of witchcraft; Bhondubaba arrested by Wakad police 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर