Pune Crime | पुण्यात गुण वाढविण्याच्या आमिषाने 12 वी च्या मुलीकडे शरीर सुखाची मागणी; शिक्षकास धो-धो धुतला अन् काढली धिंड (व्हिडीओ)

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Crime | बारावीत शिक्षण घेत असलेल्या मुलीला ‘गुण’ वाढवून देतो असे सांगत शरीर सुखाची (physical relation) मागणी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘त्या’ शिक्षकाची नातेवाईकांनी आज महाविद्यालय ते पोलीस ठाणे (Police Thane) अशी धिंडच काढली. यावेळी त्याच्या अंगावर शाई फेक करत त्यास चांगलाच चोप देण्यात आला. त्या प्रकरणाचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. Pune Crime | Demand for physical relation from 12th standard girl in Pune with the lure of increasing marks; teacher is in trouble

 

व्हिडीओ पाहण्यासाठी आवश्य पोलीसनामाच्या फेसबुक पेजला भेट द्या (Watch Video On Policenama Facebook Page. Just Click Here)

अभिजित पवार (Abhijit Pawar) असे या शिक्षकाचा नाव आहे.
याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (vishrambag police station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित पवार एका मध्यवस्तीत असलेल्या नामांकित महाविद्यालयात शिक्षक आहे. तर पीडित मुलगी येथे बारावीच्या वर्गात शिक्षण (12th standard girl) घेत होती.
या विद्यार्थिनीला मार्क वाढवून देतो म्हणून शरीर सुखाची मागणी केली.
मात्र तिने याला नकार दिला. त्यानंतरही तो सतत शरीर सुखाची मागणी करत होता.
त्याचा सतत त्रास सहन न झाल्याने तिने घरच्यांना माहिती दिली.
त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या मुलीने या शिक्षकाच्या बोलण्याचे रेकॉर्डिंग केले आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी आवश्य पोलीसनामाच्या फेसबुक पेजला भेट द्या (Watch Video On Policenama Facebook Page. Just Click Here)

आज (बुधवार) दुपारी मुलीच्या कुटुंबिय व नातेवाईकांनी महाविद्यालयात धाव घेतली.
तसेच त्या शिक्षकावर शाई फेकत त्याचे तोंड काळे केले.
त्यानंतर त्याला चोप देत त्याची धिंड विश्रामबाग पोलीस ठाण्यापर्यंत (vishrambag police station) काढली. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे.
सध्या विश्रामबाग पोलिस स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

Web Title : Pune Crime | Demand for physical relation from 12th standard girl in Pune with the lure of increasing marks; teacher is in trouble

Pune Crime | आई-वडिलांच्या वाढदिवसानिमित्त टिळक रस्त्यावरील हॉटेलचं जेवण मागवणं पडलं 50 हजाराला, जाणून घ्या प्रकरण

Maharashtra Unlock | महाराष्ट्रातील निर्बंध शिथिल होणार?

Pune Crime | पुण्यात संपत्तीच्या वादातून सुनेकडून वृध्द सासू अन् पतीला मारहाण, मौल्यवान वस्तूंची तोडफोड करत ‘राडा’