
Pune Crime | 22 वर्षाच्या तरूणाकडून 31 वर्षीय तरूणीकडे शरीर सुखाची मागणी ! पठ्ठयानं थेट KISS घेवून केला विनयभंग; हडपसर परिसरातील घटना
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या तरुणीला तिचा नातेवाईक असलेल्या तरुणाने लग्नाची मागणी घातली. त्याला नकार देऊन तिने त्या तरुणाला ब्लॉक केले. तेव्हा त्याने घरी येऊन ‘नाही तर मी आत्महत्या करेल’, ‘अशी धमकी देत तिचा जबरदस्तीने चुंबन (KISS) घेऊन विनयभंग (Molestation Case) केला. ही घटना हडपसर (Hadapsar) परिसरात घडली आहे (Pune Crime). याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) उजनी येथील 22 वर्षीय तरूणाला अटक केली आहे.
याप्रकरणी मांजरी (Manjri) येथील एका ३१ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा नातेवाईक आहे. त्याने जून २०२१ मध्ये या तरुणीला फोन करुन प्रपोज करुन लग्नाची मागणी (Demand Marriage) घातली. तेव्हा तिने त्याला नकार देऊन त्यांचा फोननंबर ब्लॉक केला होता (Pune Crime). तेव्हा त्याने वेगवेगळ्या नंबरवरुन कॉल करुन तिला वारंवार त्रास दिला. तो फिर्यादीच्या घरी येऊन घराची बेल वाजवायचा, त्यावेळी फिर्यादी यांनी दार उघडून त्याला पाहिल्यावर घराचे दार लावून घ्यायच्या. ३१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता आरोपी फिर्यादीच्या घरी आला. फक्त एकदा शेवटचे बोलायचे आहे, असे म्हटल्याने फिर्यादी हिने त्याला घरात घेतले. घरात आल्याने त्याने तिच्याकडे एक रात्र शरीरसुखाची मागणी (Physical Relation) करुन “नाही तर मी आत्महत्या करेल,’ अशी धमकी दिली. तिला ओढत बेडरुममध्ये नेऊन तिचा जबरदस्तीने किस घेतला. फिर्यादी यांनी आरडाओरडा केल्यावर तो पळून गेला. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक माने तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Demand for Physical Relation from 22 year old to 31 year old girl ! Incidents in Hadapsar area
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Charity Pune Division | 2 हजार प्रकरणे निकाली काढून धर्मादाय पुणे विभाग महाराष्ट्रात पुन्हा अव्वल