Pune Crime | पुण्यात कॅफे चालवणाऱ्या महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी, दुकान मालकावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | महत्त्वाचे बोलायचे असल्याचे सांगून कॉफी शॉप (Cafe Shop) चालवणाऱ्या महिलेला किचनमध्ये बोलावून तिचा विनयभंग (Molestation) केल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड (Sinhagad Road) पोलिसांनी (Pune Police) दुकान मालकावर (Shop Owner) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर 2020 मध्ये वडगाव बुद्रुक (Wadgaon Budruk) येथे घडला आहे.

 

याबाबत शिवणे येथे राहणाऱ्या 48 वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी महेश मुरलीधर शिंदे Mahesh Muralidhar Shinde (रा. सहकारनगर, पुणे) याच्या विरुद्ध IPS 341, 354, 354 अ, 441, 504, 506, 509 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे आरोपी शिंदे याच्या वडगाव बुद्रुक येथील दुकानात कॉफी शॉप आहे.
आरोपीने पीडित महिलेला महत्त्वाचे बोलायचे असल्याचे सांगून किचनमध्ये बोलावून घेतले.
त्याठिकाणी महिलेसोबत अश्लील चाळे (Pornography) करुन विनयभंग केला.
तसेच पीडित महिला चालवत असलेले शॉप खाली करावे यासाठी अश्लील शिवीगाळ केली.
आरोपीने पीडित महिलेला दुकान खाली करायचे नसेल तर शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवण्याची मागणी केली. महिलेचे पती आजारी असल्याने त्यांनी मंगळवारी (दि.29) सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे (PSI Shinde) करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Demand for physical Relation from a woman running a cafe in Pune FIR against shop owner Mahesh Muralidhar Shinde

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा