Pune Crime | महिना 10 ते 15 टक्के व्याजाने पैसे देऊन 3 लाख रुपये खंडणीची मागणी; खासगी सावकार अमोल गायकवाड याच्यावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | व्यवसायासाठी खासगी सावकाराकडून (Private Lenders In Pune) व्याजाने (Interest) घेतलेले पैसे परत केले असताना 3 लाख 30 हजार रुपयांची खंडणी (Ransom) मागून धमकी (Threat) देणाऱ्या खासगी सावकारावर खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
अमोल दत्तात्रय गायकवाड (Amol Dattatraya Gaikwad) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी (Pune Police) आरोपी गायकवाड याच्यावर आयपीसी 385, 323, 504 महाराष्ट्र सावकारी अधिनियम (Maharashtra Lenders Act) 39, 45 नुसार गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

याबाबत रोहित रामदास चोरगे Rohit Ramdas Chorge (वय – 30 रा. नाना पेठ, पुणे) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अमोल दत्तात्रय गायकवाड (वय – 30 रा. जिजाऊ पॅलेस, धायरीगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार डिसेंबर 2019 ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत टिळक रोड (Tilak Road) येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यारी रोहित यांनी आरोपी अमोल गायकवाड याच्याकडून व्यवसायासाठी 85 हजार रुपये व्याजाने घेतले होते.
आरोपीने 10 ते 15 टक्के व्याजाने पैसे फिर्यादी यांना दिले होते.
फिर्यादी यांनी आरोपीला 80 हजार रुपये व 2000 हजार रुपये व्याज असे एकूण 82 हजार रुपये दिले होते.
मात्र उर्वरीत मुद्दल आणि व्याज त्यांना देता आले नाही.
आरोपीने मुद्दल आणि पैशांची मागणी करुन रोहीत यांना मारहाण (Beating) केली.
तसेच फोनवर शिवीगाळ (Swearing) केली. (Pune Crime)

 

मुद्दल आणि व्याजाची रक्कम मागून आरोपीने घर खाली करण्याची धमकी देऊन 3 लाख 30 हजार रुपयांची मागणी केली.
तडजोडीमध्ये दोन लाख रुपये खंडणीची मागणी केली. फिर्यादी यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अमोल गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास दत्तवाडी पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Demand for ransom of Rs 3 lakh per month at 10 to 15 per cent interest FIR against private lender Amol Gaikwad

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा