Pune Crime | पुण्यातील प्रसिध्द ज्वेलर्सकडे ED व SFIO च्या नावाने 50 लाखाच्या खंडणीची मागणी; रूपेश चौधरी, अमित मिरचंदाणी यांच्यासह 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune Crime) एका प्रसिद्ध ज्वेलर्सच्या उद्योगसमूहाच्या कंपनीने घेतलेल्या कर्जामध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा बनाव रचून ED व SFIO च्या नावाने 50 लाख रुपयांची खंडणी (extortion) मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला (Pune Crime) आहे.

याप्रकरणी ज्वेलर्सकडून 43 वर्षीय संचालकाने विश्रामबाग पोलिसांकडे vishrambaug police station (गु. र. नं. 118/21) फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुपेश चौधरी (Rupesh Chaudhary), अमित मिरचंदानी (Amit Mirchandani), विकास भल्ला (Vikas Bhalla), संतोष राठोड (Santosh Rathod) व इतरांविरुद्ध 385, 387, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवार पेठेतील (shaniwar peth) मिरचंदानी त्यांच्या कार्यालयात 22 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन फिर्यादीच्या ग्रुपमधील एका कंपनीने डी. एच. एल. एफ. (DHLF) यांच्याकडून घेतलेल्या कर्जात आर्थिक घोटाळा झाला आहे, असा बनाव रचला. त्या प्रकरणात आयकर विभागाने (Income Tax Department) हरकत घेतली असून त्यामुळे ईडी व एस एस आय ओ यांनी त्रुटी काढल्या आहेत, असे चित्र निर्माण केले. संतोष राठोड याने ईडीचे दिल्लीतील अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत.

ते पुण्यात (Pune Crime) आलेले असून तुमची केस त्यांच्याकडे प्रलंबित आहे. ते प्रकरण मिटवून देतो, असे सांगितले.
त्याला फिर्यादी नकार दिल्यावर रुपेश चौधरी याने फिर्यादीस बघुन घेईन अशी धमकी दिली.
त्या सर्वांनी प्रकरण मिटविण्यासाठी फिर्यादीकडे 50 लाख रुपयांची मागणी केली आहे, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट एक कडे सोपविण्यात
आला असून पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Demand for ransom of Rs 50 lakh in the name of ED and SFIO from renowned jewelers in Pune; A case has been registered against 5 persons including Rupesh Chaudhary and Amit Mirchandani

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | 21 वर्षीय महिलेचं पतीच्या मित्राशी ‘जुळलं’, पत्नीनं त्याच्याशी ‘झेंगाट’ असल्याचं नवर्‍याला सांगितलं, नंतर ‘लफडं’ पोलिसांपर्यंत गेलं

Pune Crime | 42 वर्षीय महिला डॉक्टरच्या लैंगिक संबंधाबाबत व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर मॅसेज; अश्लिल संभाषण करणारा पुण्यातील डॉक्टर ‘गोत्यात’

44 कोटी SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! उद्यापासून 3 दिवस ‘या’ वेळेत करू शकणार नाही पैशांचा व्यवहार; जाणून घ्या का?