Pune Crime | 4 कोटी 60 लाख रुपयांची मागणी ! सावकारीतून डोक्यात वार करुन खुनाचा प्रयत्न; वानवडी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | उसने पैशांचे प्रकरण सर्व पैसे देऊन मिटले असताना आणखी 4 कोटी 60 लाख रुपयांची मागणी करुन तिघांनी हत्याराने डोक्यात वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Pune Crime) केला. याप्रकरणी विजेंयद्र पवार (वय 32, रा. सोपानबाग, घोरपडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संपत इसवे, इलीयस शेख, रामा अशा तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयेंद्र पवार यांनी संपत इसवे याच्याकडून उसने पैसे घेतले होते. ते प्रकरण मिटले असतानाही संपत इसवे, उलीसय शेख, व रामा असे तिघे जण रविवारी सकाळी सव्वा नऊ वाजता पवार यांच्या घरात जबरदस्तीने घुसले. संपत याने पुन्हा 4 कोटी 60 लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादी यांनी माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितले. तेव्हा शेख याने दरवाजा लावून घेतला. संपत याने त्याच्या बॅगेमधील हत्यार काढून फिर्यादी यांच्या डोक्यावर वार करीत असताना तो त्यांच्या पायावर लागून फिर्यादी जखमी झाले. तसेच त्यांच्या भावाने मध्ये पडून अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याला देखील धक्काबुक्की करुन वार करण्याचा प्रयत्न करुन किरकोळ जखमी केले. वानवडी पोलीस ठाण्याचे (Wanwadi Police Station) पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Demand for Rs 4 crore 60 lakh! Attempted murder by stabbing in the head by a lender; Incidents in the Wanwadi area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने भररस्त्यात पोलीस अधिकाऱ्याची कॉलर पकडली, दोघांना अटक

NDA Cadet Dies in Pune | एनडीएमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे लष्कर न्यायालयाचे आदेश

Pune Crime | घटस्फोटीत पती आणि प्रियकराच्या त्रासाने महिलेने केली गळफास लावून आत्महत्या; पुण्याच्या येरवडयातील घटना