Pune Crime | विमाननगर परिसरात जबरदस्तीने हप्ता वसुली करणार्‍या टोळक्यांवर खंडणीचा गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हातगाडी व्यवसाय करायचा असेल तर दरमहा १० हजार रुपये हप्ता (Hafta Wasuli) द्यावा लागेल, अशी धमकी देऊन एका टोळक्याने हातगाडीचालकाकडून जबरदस्तीने (Extortion Money) २ हजार रुपये काढून घेतले. (Pune Crime)

 

याप्रकरणी विमाननगरमधील (Viman Nagar, Pune) एका २१ वर्षाच्या तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३३१/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जितेंद्र भोसले (रा. विमाननगर) व त्यांच्या ३ ते ४ साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार विमाननगरमधील सांबर हॉटेलचे शेजारील गल्लीमध्ये २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजण्याच्या दरम्यान घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सांबर हॉटेलच्या गल्लीत पेरु व कच्ची दाबेलीचा हातगाडीचा व्यवसाय करतात. जितेंद्र भोसले व त्याचे साथीदार त्यांच्या हातगाडीपाशी आले. फिर्यादी व त्यांच्या कामगाराला शिवीगाळ करुन ‘‘तू इथं कोणाला विचारुन धंदा लावतो इथं धंदा करायचा असेल तर मला महिन्याला १० हजार रुपये हप्ता द्यायला लागेल. जर हप्ता दिला नाही तर तुला बघतो. पुणे महानगरपालिकेत माझी ओळख असून तुझ्या गाडीवर कारवाई करायला लावतो. आणि जर पोलिसांत गेलास तरी माझं काही वाकडं होणार नाही. माझी ओळख आहे,’’ अशी धमकी दिली. त्यांच्याकडून जबरदस्तीने २ हजार रुपये काढून घेतले. फिर्यादी यांनी घाबरुन सुरुवातीला फिर्याद दिली नव्हती. त्यानंतर बुधवारी त्यांनी फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक पाठक तपास करीत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Crime | Demand Of Extortion Money In Viman Nagar Area FIR Against Gang

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा