Pune Crime | शेतकर्‍याकडेच एक कोटी रूपयाची मागणी; मंगलदास बांदलला पुण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शिवाजीराव भोसले सहकारी बँक लिमिटेड या (shivajirao bhosale sahakari bank) बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अडचणीत सापडलेल्या पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास विठ्ठल बांदल (mangaldas bandal) यांच्या अडचणीत आणखी वाढ (Pune Crime) झाली आहे.

शिवाजीराव भोसले सहकारी बँक लिमिटेड या बँकेतील अधिकाऱ्याशी संगणमत करीत शेतकऱ्याच्या मालकीच्या जमीनीचे गहाणखत करून 6 कोटी 75 लाख रूपये परस्पर बँकेतून काढून घेतले. तसेच जमिनीवरील बोझा कमी करण्यासाठी शेतकऱ्याकडेच 1 कोटी रूपयाची मागणी केल्याप्रकरणी मंगलदास बांदलला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या प्रकरणात बांदल यांच्यासह पाच जणांविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यातील संदिप उर्फ आप्पा उत्तमराव भोंडवे (वय 47, लोणीकंद), विकास दामोदर भोंडवे (वय 43, रा. वढू खुर्द) या दोघांना न्यायालयाने जामीन दिलेला आहे. आरोपी सचिन पालांडे आणि हनुमंत केमधरे या दोघांचा शोध घेत आहेत. त्यांच्याविरोधात एका 74 वर्षिय शेतकऱ्याने फिर्याद दिली आहे. वढू खूर्द भागात 2013 आणि त्यानंतरच्या कालावधीत हा प्रकार घडला.

या प्रकरणी पुणे शहर गुन्हे शाखा युनिट 6 ने (Pune Police Crime Branch) मंगलदास बांदल यास शुक्रवारी अटक करून न्यायालयात हजर केले.
आरोपींनी फिर्यादीचे बनविलेले गहाणखतासंदर्भात कागदपत्रे हस्तगत करणे,
तसेच गहाणखत बनवून बँकेकडून घेतलेले 6 कोटी 75 लाख रूपयांची विल्हेवाट कशी लावली याचा आरोपींकडे तपास करायचा आहे.
गुन्ह्यात (Pune Crime) वापरलेले रिव्हॉल्वर जप्त करणे आदी तपास करण्यासाठी त्याला 7 दिवसाची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सहायक सरकरी वकील विजयसिंह जाधव (Assistant Public Prosecutor Vijay Singh Jadhav) यांनी केली.
या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी न्यायालयाने त्याला 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

शेतकर्‍याला दमदाटी करीत दाखवला रिव्हॉल्वरचा धाक :

आरोपी मंगलदास बांदलसह इतर आरोपींनी शिवाजीराव भोसले बँकेतील अधिकार्‍याशी संगणमत केले.
तसेच फिर्यादींना चारचाकी गाडीत डांबून ठेवत दमदाटी केली आणि रिव्हॉल्वरच्या धाकाने फिर्यादीच्या
मालकीची वढू खुर्द भागातील 3 हेक्टर 71 आर जमीनीचे गहाणखत केले
आणि 6 कोटी 75 लाख रूपये परस्पर बँकेतून काढून घेतले.
तसेच जमिनीवरील बोझा कमी करण्यासाठी आरोपींनी फिर्यादींकडे 1 कोटी रूपयांची मागणी केली आहे. तसेच अद्याप बोझा कमी केला नसल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Titel :-  Pune Crime | Demand of one crore rupees from the farmers themselves; Mangaldas Bandal arrested by Pune Crime Branch police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pensioner ला Life Certificate देण्यासाठी मिळेल जास्त वेळ, ‘या’ केंद्रांवर करू शकतात जमा

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 217 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

BMC | बीएमसीची घोषणा ! गणेश चतुर्थीनंतर मुंबईत परतणार्‍यांना करावी लागेल कोविड-19 चाचणी