Pune Crime | कंपनीला माल सप्लाय करण्यासाठी खंडणीची मागणी ! गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक – 2 कडून खंडणीबहाद्दरांच्या म्होरक्यासह तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शहरात वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये माल सप्लाय करणार्‍यांना गुंडांचा (Pune Criminals) त्रास सातत्याने सहन करावा लागत आहे. इतकेच नाही तर या कंपन्यांच्या गेटवर गुंडाराज असून त्यांच्या परवानगीशिवाय माल सप्लाय करणार्‍या वाहनांना आत सोडले जात नसल्याचे चित्र दिसून आले आहे. विक फिल्ड इमारतीमधील (Weak Field Building Yerwada Pune) बजाज फायनान्स (Bajaj Finance) या कंपनीमध्ये चहा, कॉफीचे मटेरियल बॉक्स पुरविण्यासाठी खंडणी (Ransom) मागणार्‍या तिघांना गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक – 2 ने (Anti Extortion Cell Pune) सापळा रचून पकडले. (Pune Crime)

 

आसिफ उर्फ बबलू युसूफ खान Asif alias Bablu Yusuf Khan (32, रा. येरवडा), इफराज फिरोज शेख Ifraz Feroze Shaikh (वय ३०, रा. जयप्रकाशनगर, येरवडा) आणि तुषार विष्णु आढवडे Tushar Vishnu Adhwade (वय ३६, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

 

याप्रकरणी जयपाल गोकुळ गिरासे (वय २४, रा. अतुलनगर, वारजे माळवाडी) यांनी येरवडा पोलिसांकडे (Yerwada Police) फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे १५ एप्रिल रोजी दुपारी विक फिल्ड इमारतीमधील बजाज फायनान्स या कंपनीमध्ये चहा, कॉफीचे मटेरियलचे बॉक्स देण्यासाठी गेले होते.
त्यावेळी तेथील गेटवर आरोपींनी फिर्यादींची गाडी अडविली. तू बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयामध्ये स्वत: चहा, कॉफी मटेरियलचे बॉक्स नेवून ठेवले तरी मला प्रत्येक ट्रिपमागे ५०० रुपये प्रमाणे द्यावे लागतील.
तू जोपर्यंत पैसे देणार नाही, तोपर्यंत तुझी गाडी आत जाऊ देणार नाही, अशी धमकी दिली.
फिर्यादीस त्या ठिकाणाहून काढून दिल्यानंतर आसिफ खान याने १८ एप्रिल रोजी फिर्यादी यांना फोन केला.
त्यांना प्रत्येक महिन्याला ३ हजार रुपये खंडणी देण्याची मागणी केली. फिर्यादी यांनी खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार केली.
पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे बुधवारी दुपारी २ वाजता फिर्यादी हे २ हजार रुपयांची बनावट नोटेवर २ पाचशेच्या खर्‍या नोटा घेऊन विक फिल्ड इमारतीच्या आऊट गेटसमोर गेले.
तेथे इफराज शेख व तुषार आढवडे हे पैसे घेण्यासाठी आले.
त्यांनी फिर्यादीकडून पैसे घेतल्यानंतर तेथे असलेल्या पोलिसांनी आरोपींना पकडले. येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) खंडणीचा गुन्हा दाखल केला.

दरम्यान, कुठलेही काम न करता माथाडीच्या नावाखाली कोणी खंडणी स्वरूपात पैशाची मागणी करत असल्यास संबंधितांनी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक – 2 कडे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) ,
अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhre),
पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan),
पोलीस अंमलदार शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, प्रदिप शितोळे, विजय गुरव, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, संग्राम शिनगारे,
सैदोबा भोजराव, अमोल पिलाने, प्रवीण पडवळ, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, आशा कोळेकर यांच्या पथकाने आरोपींना अटक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Demand ransom for supplying goods to the company Pune Police Crime Branch Anti Extortion Cell 2 arrested three persons including the leader of Ransom gang

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा