Pune Crime | स्क्रॅप व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देत मागितली दीड कोटीची खंडणी, पुण्यातील कोंढवा येथील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भागीदारीमध्ये स्कॅपचा व्यवसाय करणाऱ्या भागीदारालाच जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देऊन दीड कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार पुण्यातील (Pune Crime) कोंढवा बुद्रुक (Kondhwa Budruk) येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजी जलसेराव उबाळे (Shivaji Jalserao Ubale) याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) आयपीसी 384. 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत संतोष जवेरचंद सेठीया Santosh Javerchand Sethia (वय-60 रा. हेमकुंज सोसायटी, मुकुंदनगर, पुणे) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शिवाजी उबाळे (रा. रामटेकडी, अंधशाळेच्या समोर, पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2022 ते 23 मार्च 2022 या कालावधीत येवलेवाडी येथील सारिका इंटरप्राईजेस (Sarika Enterprises Yeolawadi) येथे घडला. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करुन शनिवारी (दि.23) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवाजी उबाळे याचे वडिल आणि फिर्यादी संतोष सेठीया यांच्यामध्ये भागीदारीत (Partnership) स्क्रॅपचा व्यवसाय (Scrap Business) आहे. मात्र आरोपीच्या वडिलांनी काम करणे बंद केले होते. दरम्यान आरोपी फिर्यादी यांच्या वर्कशॉपवर गेला. त्याठिकाणी त्याने वडिलांनी केलेल्या कामाचे पैसे फिर्यादी यांच्याकडे नसताना देखील त्यांच्याकडे कामाचे दीड कोटी रुपये मागितले. तसेच अ‍ॅक्सा ब्लेडचा धाक दाखवून मुंडके कापून टाकण्याची धमकी दिली.

या प्रकारानंतर फिर्यादी आणि आरोपी यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यात कोणताच समझोता झाला नाही.
त्यामुळे संतोष सेठीया यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला.
पोलिसांनी तक्रार अर्जाची चौकशी करुन आरोपी शिवाजी उबाळे याच्यावर गुन्हा दाखल केला.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील (PSI Patil) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Demands Rs 1.5 crore ransom for threatening to kill scrap dealer, type at Kondhwa in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weight Loss Fruit | वजन कमी करायचं आहे? ‘या’ 5 आरोग्यदायी फळांचं सेवन केल्यानं होईल बक्कळ फायदा, जाणून घ्या

 

Vijay Wadettiwar | ‘उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसा वाचायला ते काय तुमच्या बापाचे…’: मंत्री विजय वडेट्टीवारांची जीभ घसरली

 

Pune Crime | साडीला इस्त्री करण्याचे जास्त पैसे घेतल्यावरुन हडपसरमध्ये राडा, दगडफेक करुन केली मारहाण