Pune Crime | पोलिस आयुक्तांच्या गंभीर इशार्‍यानंतरही येरवडयात अवैध धंद्ये ‘जोमात’ असल्याचं उघड; उपायुक्तांच्या विशेष पथकाची जुगार अड्ड्यांवरील 32 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शहरात अवैध धंदे (Illegal Trades) सुरु असल्याचे समजल्यावर संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) आणि सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Shisve) यांनी सुमारे 2 आठवड्याभरापुर्वी झालेल्या बैठकीत दिल्यानंतरही येरवडा (Yerwada Police Station) परिसराच्या हद्दीत जुगाराचे अवैध धंदे सुरु असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar) यांच्या कार्यालयातील पथकाने या दोन ठिकाणी छापा मारुन तब्बल 32 जणांवर कारवाई केली आहे. (Pune Crime)

 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी शहरात अवेध धंद्यांवर तातडीने कारवाई करा, असे आदेश मिटिंगमध्ये (Crime Meeting) दिले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात झालेल्या मिटिंगमध्ये त्यांनी पुन्हा या आदेशाची आठवण करुन दिली. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरु असल्याचे आढळून येतील, तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांनी कारवाई देखील केलेली आहे. (Pune Crime)

 

येरवडा येथील कंजार भाट वस्तीतील सनी माछरे याच्या कॅरम हाऊसच्या वरील बंदिस्त खोलीमध्ये जुगार (Gambling in Pune) सुरु असल्याची माहिती माहिती शनिवारी (दि. 19 फेब्रुवारी) पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांच्या कार्यालयातील पथकाला मिळाली. त्यानुसार या पथकाने तेथे छापा घातला. तेव्हा तेथे तब्बल 19 जण फ्लॅश पत्याचा जुगार खेळत असताना आढळून आले. पोलिसांनी या 19 जणांवर कारवाई (Pune Police Action) केली. त्यांच्याकडून 7 मोबाईल, 14 हजार 340 रुपये रोख असा एकूण 24 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आठवडयाभरापुर्वी झालेल्या कारवाईची चर्चा पोलिस दलात (Pune Police) सुरू आहे. अखेर त्या कारवाईची माहिती बाहेर पडलीच.

या कारवाईनंतर विमानतळ पोलीस ठाण्याच्या (Viman Nagar Police Station) हद्दीत महालक्ष्मी लॉन्सजवळ जुगार अड्डा (Gambling Spot)
सुरु असल्याची माहिती तीन दिवसांपुर्वी उपायुक्त राहिदास पवार यांच्या पथकाला मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर छापा घातला. तेथे 13 जण जुगार (Gambler) खेळताना आढळून आले.
त्यांच्यावर देखील कारवाई (Pune Police Action On Gambling) करण्यात आली.
त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा 24 हजार 100 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

 

 

परिमंडळ 4 च्या हद्दीत कोठे अवैध धंदे सुरु असल्याची माहिती मिळाल्यास त्यानुसार उपायुक्ताच्या कार्यालयातील पथक तेथे जाऊन कारवाई करत आहे.
येरवडा व विमानतळ पोलीस ठाणे यांच्या हद्दीत गेल्या काही दिवसात 2 कारवाया करण्यात आल्या आहेत.
यापुढे कोठे अवैध धंदे सुरु असल्याचे समजल्यावर तेथे हे पथक कारवाई करेल, असे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी सांगितले.

 

 

Web Title :- Pune Crime | Despite serious warnings from the Commissioner of Police Amitabh Gupta, illegal trades are rampant in Yerwada; Special team of Deputy Commissioner takes action against 32 persons at gambling dens

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | बनावट पदवी प्रमाणपत्रे देऊन MIT ला घातला 57 लाखांना गंडा; कानपूर विद्यापीठाच्या नावाने दिली पदवी प्रमापत्रे, 280 विद्यार्थ्यांची फसवणूक

 

Health Department Exam Paper Leak Case | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरण ! 20 आरोपींवर न्यायालयात 3816 पानांचे दोषारोपपत्र

 

IT Raid On Yashwant Jadhav | NCP च्या मलिकांनंतर आता शिवसेनेवर निशाणा ! मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर ‘आयकर’चा छापा, 5 ठिकाणी ‘रेड’