Pune Crime | कोर्स पूर्ण करुनही काम मिळत नसल्याच्या रागातून ‘फिल्म अ‍ॅकॅडमी’च्या संचालिकेला बेदम मारहाण, इन्स्टीट्युटची केली तोडफोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कोर्स पुर्ण केल्यानंतर काम मिळत नसल्याच्या रागातून शिवाजीनगर येथील एका फिल्म अकॅडमीच्या (Film Academy) संचालिकेला (Director) फरफटत नेऊन मारहाण (Beating) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे. तसेच काही जणांनी कार्यालयाची तोडफोड केली. संतप्त विद्यार्थी, प्रहार संघटनेचे कार्यकर्ते (Prahar Organization Activists) आणि एका माजी कर्मचाऱ्याने हे कृत्य केले आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) 14 जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार 27 मार्च रोजी दुपारी सव्वा तीन ते साडेतीन या दरम्यान घडला आहे.

 

चार महिला, प्रशांत काटकर Prashant Katkar (वय-28), प्रहार चित्रपट संघटनेचा मंगेश शिरसाठ Mangesh Shirsath (वय-27) यांच्यासह 7-8 पुरुष व महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 30 वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर (Ferguson College Road) एक नावाची संस्था आहे.
याठिकाणी विद्यार्थ्यांना अभिनयाचे (Acting) व इतर प्रकारचे प्रशिक्षण (Training) दिले जाते. या संस्थेत प्रशांत काटकर हा काम करत होता.
त्याला काही दिवसांपूर्वी कामावरुन काढून टाकले आहे. तर फिर्यादी यांच्याकडे विद्यार्थी म्हणून असलेल्यांना अद्याप काम मिळालेले नाही.

काम न मिळाल्याचा राग मनात धरुन सर्वजण 27 मार्च रोजी अकॅडमीच्या कार्यालयात बेकायदा घुसले.
यानंतर त्यांनी कार्यालयातील काचेची फ्रेम, फ्लेक्स, रस्त्यावरील जाहिरीतीचे फ्लेक्स असे एकूण 20 हजार रुपयांचे नुकसान केले.
यानंतर फिर्यादी यांचे केस ओढून त्यांना हाताने बेदम मारहाण करुन फरफटत नेऊन जखमी केले. यामध्ये त्यांची चेन गहाळ झाली.
या घटनेचे चित्रीकरण इशान लोखंडे व प्रशांत काटकर आणि मंगेश शिरसाठ यांच्या मोबाईलमध्ये केले.
तसेच हे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Director of ‘Film Academy’ beaten up for not getting job even after completing course, Institute vandalized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

Summer Weight Loss Tips | केवळ कडक उन्हापासूनच वाचवणार नाही, तर पोटाची चरबी आणि एक्स्ट्रा बॉडी फॅटसुद्धा कमी करतील ‘या’ 2 गोष्टी

 

Sainath Babar-Vasant More | पुणे मनसेच्या आजी-माजी शहराध्यक्षांची ‘चाय पे चर्चा’ ! वसंत मोरेंनी साईनाथ बाबर यांना दिल्या शुभेच्छा

 

Rohit Pawar on Sanjay Raut | रोहित पवारांचा संजय राऊतांना सल्ला; म्हणाले – ‘राजकीय नेत्यांनी शब्द जपून वापरावेत’