Pune Crime | फ्लॅटच्या व्यवहारातून वाद, शिवसेनेच्या नगरसेवकावर फसवणुकीचा FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथील फ्लॅटच्या व्यवहाराच्या (Flat deals) वादातून (Pune Crime) शुक्रवारी (दि.26) वाकड पोलीस ठाण्यात (Wakad police station) परस्पर विरोधी गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहे. यामध्ये व्यावसायिकाने शिवसेनेच्या नगरसेवकाविरुद्ध (Shiv Sena corporator) फसवणूक (Cheating) केल्याची तक्रार दिली आहे. तर नगरसेवकाने व्यावसायिकाने खंडणी (Ransom) मागितल्याची तक्रार दिली आहे. वाकड पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हे (FIR) दाखल केले आहे.

 

व्यावसायिक प्रितेश दुगड Pritesh Dugad (वय-49 रा. मित्रमंडळ चौक, पुणे) यांनी शिवसेनेचे नगरसेवकर नीलेश हिरामण बारणे (Nilesh Hiraman Barne), अविनाश लाला बारणे Avinash Lala Barne (वय-44), महेश हिरामण बारणे Mahesh Hiraman Barne (तिघे रा. थेरगाव) यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. तर नीलेश बारणे यांनी दुगड यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरसेवक नीलेश बारणे तसेच अविनाश बारणे आणि महेश बारणे यांच्या भागीदारीतील समर्थ लँडमार्क (Samarth Landmark Thergaon) या संस्थेच्या थेरगाव येथील गृहप्रकल्पात फिर्यादी प्रितेश दुगड यांनी त्यांच्या पत्नीच्या आणि स्वत:च्या नावावर एक असे दोन फ्लॅट खरेदी केले होते. यानंतर दुगड यांनी फ्लॅटचा ताबा मागितला असता, फ्लॅटचा ताबा दिला नाही. तसेच समर्थ लँडमार्कच्या भागीदारांनी गृहप्रकल्पातील सर्व प्लॅट बँकेकडे गहाण ठेवून पाच व सात कोटी कर्ज घेतले. परंतु या फ्लॅटवर कोणताही बोजा नाही, असे सांगून दुगड व त्यांच्या पत्नीच्या फ्लॅटची विक्री केली. तसेच फिर्यादी दुगड यांचे पैसे परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (Pune Crime)

 

बारणेंची दुगड यांच्याविरुद्ध तक्रार

प्रितेश दुगड यांच्या विरोधात अविनाश बारणे यांनी फिर्याद दिली आहे.
यानुसार दुगड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दुगड यांनी शांताई पार्क, थेरगाव या प्रोजेक्टमध्ये 49 लाख 67 हजार 700 रुपयांना फ्लॅट खरेदी केले.
त्या फ्लॅटचा ताबा वेळेवर दिला नाही, तसेच गृहप्रकल्पावर बँकेकडून कर्ज काढले.
या कारणावरुन दुगड यांनी फ्लॅटचा ताबा घेण्यास नकार दिला.
तसेच फिर्यादी अविनाश बारणे यांच्याकडे दीड कोटी रुपयांची खंडणी मागितली.
पैसे दिले नाही तर पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Dispute over flat deal, FIR of fraud against Shiv Sena corporator wakad police station-corporator-Nilesh Hiraman Barne

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Anti Corruption Bureau Ahmednagar | गुन्ह्यात मदत करण्यासाठी 10 हजाराची लाच घेताना पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

Nawab Malik | ‘पब, पार्टी आणि पेंग्विनमुळे महाराष्ट्राची बदनामी’ ! आशिष शेलारांच्या टीकेला नवाब मलिकांचे जोरदार प्रत्युत्तर; दिला ‘हा’ इशारा

EPFO | ‘हे’ कागदपत्र जमा केले नाही तर पुढील महिन्यापासून PF ‘कटिंग’ होईल बंद, ‘या’ पध्दतीनं टाळा असुविधा