Pune Crime | घटस्फोटीत पती आणि प्रियकराच्या त्रासाने महिलेने केली गळफास लावून आत्महत्या; पुण्याच्या येरवडयातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | घटस्फोट घेतल्यानंतरही पुन्हा लग्न करण्यासाठी घटस्फोटीत पतीचा प्रयत्न तर प्रेमसंबंधानंतर लग्नासाठी प्रियकर देत असलेला मानसिक त्रास यामुळे एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerwada Police) दोघांवर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

सोहम राजू गागडे Soham Raju Gagade (रा. इचलकंरजी, जि. कोल्हापूर) आणि गिरीश प्रविण मछले Girish Pravin Machle (रा. बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
अर्पणा अभंगे (वय २२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी अर्पणाची आई जयश्री अभंगे (वय ४०, रा. कंजारभाटनगर, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी अर्पणा हिचे सोहम गागडे याच्यावर विवाह झाला होता.
त्याने शारीरीक व मानसिक छळ केल्याने अर्पणा हिने घटस्फोट घेतला होता. त्यानंतर तिचे गिरीश मछले याच्याबरोबर प्रेमसंबंध जुळले.
त्यातून ते दोघे लग्न करणार होते. त्याचवेळी तिचा पहिला पती सोहम हाही अर्पणासोबत पुन्हा लग्न करुन संसार करणार होता.
दोघांनी लग्नासाठी खूप मानसिक त्रास दिल्याने अर्पणा हिने २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Pune Crime) केली होती.
येरवडा पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली होती.
तपासात दोघांच्या त्रासामुळे तिने गळफास घेतल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक आळेकर तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Divorced Husband and Boyfriend Trouble Suicide by Hanging Woman; Incident at Yerwada, Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Shivsena MP Sanjay Raut | दिल्लीच्या प्रतिष्ठित भागात राहतो, PM मोदी माझ्या घराच्या समोर राहतात – संजय राऊत

Maruti Alto 800 झीरो डाऊन पेमेंटवर 90 हजारात खरेदी करा, कंपनी देईल वॉरंटीसह मनीबॅक गॅरंटी

Gold Price Today | सोन्याच्या दरात सलग घसरण, चांदीही ‘स्वस्त’; जाणून घ्या