Pune Crime | पुण्यातील बड्या रुग्णालयात गरोदर महिलेला डॉक्टरकडून अमानुष मारहाण, शहरात प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  प्रसुती कळा (labor pain) येत असल्याने रुग्णालयात आलेल्या एका गरोदर महिलेला डॉक्टरने अमानुष मारहाण (doctor beat pregnant woman) केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात (Pune Crime) उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) दौंड तालुक्यातील यवत (Yavat Taluka Daund) येथील एका बड्या रुग्णालयात ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी पीडित गरोदर महिलेनं यवत पोलीस ठाण्यात (Yavat police station) आरोपी डॉक्टर विरोधात गुन्हा (FIR Lodged) दाखल केला आहे. यवत पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत पुढील तपास सुरु केला आहे.

पूजा गोरख दळवी (Pooja Gorakh Dalvi) असे मारहाण करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून त्यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पूजा यांना प्रसुती कळा येत असल्याने त्या यवत येथील नामांकित जयवंत हॉस्पिटलमध्ये (Jaywant Hospital) उपचारासाठी दाखल झाल्या होत्या.
दरम्यान त्यांना प्रसुती कळा सुरु झाल्याने हॉस्पिटलमधील एका डॉक्टरने त्यांना अमानुष मारहाण केली.
डॉक्टर पूजा दळवी यांच्या तोंडावर, डोक्यावर, हातावर मांडींवर आणि ओठांवर चापटीने आणि बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

डॉक्टरने केलेल्या मारहाणीमध्ये पूजा दळवी यांच्या डोळ्याच्या खालच्या बाजूला चेहऱ्यावर काळ्या निळ्या जखमा झाल्या आहेत.
ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात प्रचंड खळबळ उडाली. मारहाण झालेल्या पीडित महिलेने यवत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा (Pune Crime) दाखल करुन तपास सुरु केला आहे.

 

 

Web Title : Pune Crime | doctor from yavat hospital beat pregnant woman in hospital after she has labor pain incident in daund taluka of pune district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sujay Vikhe Patil | पार्थ पवार-सुजय विखेंची अचानक भेट, राजकीय तर्क-वितर्कांना उधाण

Aryan Khan Drug Case | आर्यन खानचे NCB ला वचन; म्हणाला – ‘मी एक जबाबदार नागरिक बनणार’

Anti Corruption Bureau Pune | पुण्यातील लाचखोर उपायुक्त नितीन ढगेच्या घरात सापडले 2.81 कोटींचं ‘घबाड’; ‘बेनामी’चा होणार पर्दाफाश