Pune Crime | पुण्यात कौटुंबिक वादातून डॉक्टर पतीचा डॉक्टर पत्नीवर चाकू हल्ला; विश्रांतवाडी परिसरात खळबळ

पुणे : Pune Crime | कौटुंबिक वादातून डॉक्टर पतीने स्वत:च्या डॉक्टर पत्नीवर चाकूने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना विश्रांतवाडी येथे घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी डॉ. रवी भादवड (वय 36, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) याला अटक (Pune Crime) करण्यात आली आहे.

याप्रकरणी त्यांच्या पत्नीने विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. डॉ. रवी हे मुंजाबा वस्ती येथे रहायला आहेत. तेथेच त्यांचे क्लिनिक आहे. त्यांची पत्नीही एमबीबीएस डॉक्टर आहेत. गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर पती-पत्नीत कौटुंबिक वाद सुरु होते. याच वादातून रविवारी रात्री पत्नी झोपेत असताना डॉक्टराने तिच्यावर चाकूने वार केले. या प्रकाराने त्यांची पत्नी जखमी झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पत्नीच्या फिर्यादीनंतर विश्रांतवाडी पोलिसांनी डॉ. रवी याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम अधिक तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Gold Price Today | सोने आणि चांदीच्या किंमतीत आज जबदरस्त घसरण, खरेदीपूर्वी पहा नवीन भाव

PM Modi | पंतप्रधान मोदींनी UNSC मध्ये सागरी आव्हानांना तोंड देण्यासाठी जगाला सांगितली 5 तत्त्वे; जाणून घ्या

Weight Loss with Owa | ‘या’ जबरदस्त ड्रिंकमुळे काही आठवड्यातच कमी होईल वजन, गायब होईल चरबी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | doctor husband attack on doctor wife in vishrantwadi pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update