Pune Crime | पुण्याच्या स्वारगेट परिसरातील उच्चभ्रू कुटुंबातील सुनेवर कौटुंबिक अत्याचार; प्रीतम हसमुख जैन यांच्यासह चौघांविरूध्द गुन्हा

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Crime | स्वारगेट जवळील मुकुंदनगर (Mukundnagar Swargate) परिसरात राहणाऱ्या एका उच्चभ्रू कुटुंबावर सुनेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) चार जणांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. मुलगा होण्यासाठी देखील या महिलेला त्रास देण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

प्रीतम हसमुख जैन (Pritam Hasmukh Jain), विद्या जैन (Vidya Jain), हसमुख जैन (Hasmukh Jain), प्रशांत जैन Prashant Jain (सर्व रा. पौर्णिमा टॉवर, शंकर शेठ रोड, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणी 27 वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा आणि प्रीतम यांचा 2017 साली विवाह झाला.
त्यानंतर पती, सासू-सासरे आणि दिर यांनी लग्नात आमचा नीट मानपान केला नाही असे म्हणुन पीडितेला सातत्याने अपमानित करून क्रूर वागणूक दिली.
तसेच त्यांना मुलगा होण्यासाठी विविध लोक जो सल्ला देतील त्याप्रमाणे वागायची धमकी दिली.
या सल्ल्याप्रमाणे न वागल्यास नवऱ्याचे दुसरे लग्न लावून देऊ अशी धमकी देखील दिली.
सातत्याने टोचून बोलणे तसेच त्यांचा मानसिक व शारीरिक छळ सुरू राहिल्याने पीडितेने यासंबंधी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक विद्या साबळे (PSI Vidya Sable) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Domestic atrocities on gold in a high-brow family in Swargate area of ​​Pune; Crime against four including Pritam Hasmukh Jain

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | राज ठाकरेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलं आणि यशवंतराव चव्हाण देखील’

Phone Tapping Report | रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग अहवालाचे मुख्य पत्र तपास यंत्रणेला देण्याबाबत विचार करू – राज्य सरकार

Ahmednagar News | महिला तहसीलदारांचा आत्महत्येचा इशारा; ऑडिओ क्लिपमध्ये आमदारावर आरोप