Pune Crime | अल्पवयीन मुलीशी मैत्रीचे नाटक ! 5 वर्षांपासून कुटुंबाला दहशतीखाली ठेवणार्‍या दोघांवर गुन्हा दाखल; हडपसर परिसरातील घटना

0
101
Pune Crime | Drama of friendship with a minor girl! Charges filed against two for terrorizing family for 5 years; Incidents in Hadapsar police station area
File photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime अल्पवयीन असताना तिच्याशी मैत्रीचे नाटक करुन तिचा वेळोवेळी विनयभंग करुन घरातील दागिने घेऊन संपूर्ण कुटुंबाला दोघांनी गेली ५ वर्षे दहशतीखाली ठेवले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) सचिन सूर्यवंशी आणि संकेत कामठे (दोघे रा. फुरसुंगी गाव) यांच्याविरुद्ध पोस्को (POSCO Act) अंतर्गत गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

याप्रकरणी एका १९वर्षाच्या तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन सूर्यवंशी याने फिर्यादीचा पाठलाग करुन धमकी देऊन तिच्या सोबत मैत्री करुन तिचा विश्वास संपादन केला. तिला नारायणपूरला (Narayanpur) देवदर्शनाला नेतो, असे म्हणून कारमध्ये बसवून तिला निर्जनस्थळी नेले. तेथे गाडी थांबवून जबरदस्तीने तिचा हात धरुन तिचे चुंबन घेतले. तिच्याशी प्रेमसंबंध ठेवून तिला वेळोवेळी धमकी देऊन घरातील साडेसात तोळे सोन्याचे दागिने घेऊन येण्यास सांगितले. हे दागिने तिने परत मागितल्यावर परत करण्यास नकार देऊन तिला मारहाण (Pune Crime) करुन शिवीगाळ केली.

तिची गाडी जाळण्याची धमकी दिली. तिच्या घरात शिरुन तिचा विनयभंग केला. फिर्यादीच्या आईच्या अंगावर चारचाकी गाडी घालण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या भावाला दमदाटी करुन कोयत्याचा धाक दाखविला. अशा प्रकारे दोघांनी या कुटुंबाला २०१६ पासून मानसिक व शारीरीक त्रास देऊन दहशतीखाली (Pune Crime) ठेवले होते. शेवटी या छळाला कंटाळून या तरुणीने हडपसर पोलिसांकडे तक्रार दिली असून सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Drama of friendship with a minor girl! Charges filed against two for terrorizing family for 5 years; Incidents in Hadapsar police station area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Crime News | शाळेची बस सुटल्याने 14 वर्षीय विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ टोकाचं पाऊल

MLA Nitesh Rane | ‘ठाकरे सरकारला पाटलाच्या नाही तर खानच्या पोराची चिंता’ – नितेश राणे

IPL 2022 | आयपीएलच्या टीमना बाहेर खेळण्याची परवानगी द्या, BCCI कडे मागणी

Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura | ‘चला हवा येऊ द्या’च्या निलेश साबळेंनी नारायण राणेंची पाया पडून मागितली माफी; जाणून घ्या प्रकरण

Nanded Crime | दारूसाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाचा केला खून

Local Body Elections | आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात काँग्रेसचा स्वबळाचा नारा;
आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष?

Bad Habits | तुम्हाला वेगाने वृद्धत्वाकडे ढकलताहेत ‘या’ 5 वाईट सवयी, आजच सोडून द्या