Pune Crime | वाहन चालकानं भर रस्त्यात 28 वर्षीय महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी, वानवडी परिसरात बिबवेवाडीमधील युवक ‘गोत्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात (Pune Crime) महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. पुण्यातील (Pune Crime) वानवडी परिसरात रस्त्याने पायी जाणाऱ्या एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi police) एकाला अटक (Arrest) केली असून हा प्रकार वानवडी येथील केपीसीटी मॉलच्या (KPCT Mall) समोर सोमवारी (दि.27) दुपारी तिनच्या सुमारास घडला.

चंद्रकांत रामबहाद्दर सोनी Chandrakant Ram Bahadur Soni (वय-30 रा. आनंदनगर, बिबवेवाडी, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर परिसरात राहणाऱ्या एका 28 वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

पोलीस उपनिरीक्षक भुषण पोटवडे (PSI Bhushan Potwade) यांनी दिलेल्या माहितीनुसार,
आरोपी सोनी हा चालक असून सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास पीडित महिला काम संपवून पायी जात होती.
त्यावेळी आरोपी सोनी याने महिलेला तुम्हाला घरी सोडतो असे म्हणत अश्लील शब्द वापरले.
तसेच महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली.
पीडित महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपी विरोधात 354 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भुषण पोटवडे करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Driver demands body comfort from 28-year-old woman on road, youth from Bibwewadi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ahmednagar Crime | शाळकरी विद्यार्थ्यांनी शिक्षिकेचे ‘कडक’ फोटो काढले, ‘मॉर्फ’ करून ‘अश्लील’ छायाचित्रे व्हायरल, अल्पवयीन पोरांचं ‘कांड’

Baal Aadhaar card | नवजात बालकाचं आधार कार्ड काढायचंय? तर मग बघा सोपी प्रक्रिया

Pune Crime | जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने वार, पुण्याच्या उत्तमनगरमधील घटना