पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – अमली पदार्थ विरोधी पथकाच्या गुन्हे शाखेने (Pune Crime) मोठी कारवाई केली आहे. पुणे रेल्वे स्थानक, मार्केट यार्ड आणि कोरेगाव पार्क येथे कारवाई करत गुन्हे शाखेच्या पथकाने अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून चरस, गांजा आणि मेफेड्रोन (एमडी) हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. जप्त केलेल्या मालाची (Pune Crime) बाजारात 9 लाख 34 हजार किंमत आहे.
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (Pune Crime) मार्केट यार्ड परिसरात सुरेश सिद्धराम नाटेकर (वय 33, रा. गंगाधाम, मार्केट यार्ड) याला पकडले. त्याच्याकडून 2 लाख 31 हजार किंमतीचे 231 ग्रॅम चरस जप्त केले. नाटेकर विरोधात मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरेगाव पार्क परिसरात सार्वजनिक रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचत 13 डिसेंबर रोजी ओडीसातून आलेल्या आकाशचंद्र पार्थव नायक (वय 27) याच्या मुसक्या आवळल्या.
त्याच्याकडून 4 लाख 83 हजार किंमतीचा 24 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
त्याच्या विरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच पुणे रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून जावेद अजीज सय्यद (वय 33, रा. मिठानगर, कोंढवा) याला पोलिसांनी (दि. 15) ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून मेफेड्रोन (एमडी) मिळाले आहे. या मेफेड्रोनची किंमत 2 लाख 20 हजार रुपये आहे.
सदर विविध ठिकाणी झालेल्या कारवाया वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक एस. डी. नरके, कर्मचारी मयूर सूर्यवंशी, साहील शेख, आझीम शेख, नितीन जगदाळे,
युवराज कांबळे यांच्या पथकाने केली.
Web Title :-Pune Crime | drugs worth nine and a half lakhs were seized from the trio
Sarla Ek Koti | सरला एक कोटीमध्ये ईशा केसकर मुख्य भूमिकेत!