Pune Crime | दुर्दैवी! आजोबांसोबत शाळेतून घरी जाणाऱ्या चिमुकलीचा डंपरच्या धडकेत मृत्यू

0
184
Pune Crime Pune Accident News Bharti Vidyapeeth Police Station Limits
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शाळेतून आपल्या आजोबांच्या दुचाकीवरुन घरी जाणाऱ्या वाहनाला भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने धडक (Hit) दिली. यामध्ये चार वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना खेड तालुक्यातील आळंदी (Alandi in Khed Taluka) येथे सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वडगाव रस्त्यावरील (Vadgaon Road) गो शाळेसमोर घडली. डंपर आणि ट्रकने धडक देऊन अपघातात बळी जाण्याची ही (Pune Crime) आठवड्यातील दुसरी घटना आहे.

तनिषा उर्फ परी विशाल थोरवे Tanisha aka Pari Vishal Thorve (वय -4 रा. चऱ्होली खुर्द, थोरवेवस्ती ता. खेड) असे अपघातात गंभीर दुखापत होऊन मृत झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात (Alandi Police Station) संतोष जमीरुद्दीन माल Santosh Jamiruddin Mal (रा. केळगाव, ता. खेड) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल करुन ताब्यात घेण्यात आले आहे. (Pune Crime)

आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनिषाला आळंदी येथील शाळेतून तिचे आजोबा किसन एकनाथ थोरवे (Kisan Eknath Thorway) हे दुचाकीवरुन घरी घेऊन जात होते.
वडगाव रस्त्यावरील गोशाळेसमोर दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव डंपरने जोरात धडक दिली.
अपघाताची तीव्रता मोठी असल्याने तनिषाला मोठी दुखापत होऊन मृत्यू झाला.
तर तिचे आजोबा किसन थोरवे यांच्या डोक्याला, हाताला, पोटाला, कमरेला मार लागून ते जखमी झाले आहेत.
अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळाहून पळून जात होता. मात्र, स्थानिक तरुणांनी पाठलाग करुन त्यास पकडले.
पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | dumper collided with a bike in alandi the death of a child who was going home from school with his grandfather

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Rickshaw Fare Increase | पुण्यात 1 ऑगस्ट पासून रिक्षाची भाडेवाढ ! ‘सीएनजी’ दरवाढीचा थेट फटका प्रवाशांच्या खिशाला बसणार

 

Katrina-Vicky Death Threat | कतरिना कैफ-विकी कौशल यांना ठार मारण्याची धमकी देणारा आरोपी अटकेत

 

Pune News | तलावाच्या मधोमध गेल्यावर लागला दम, महसूल विभागातील कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू