Pune Crime | पूर्वीच्या भांडणातून तरुणावर कोयत्याने वार, 6 जणांना पोलीस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना पुण्यात घडली होती. ही घटना पुण्यातील (Pune Crime) पांडवनगर (Pandavanagar) येथे सोमवारी (24) रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) 6 जणांना अटक (Arrest) केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

 

सलीम जावेद शेख असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर विजय चंद्रकांत विटकर (वय-19), मयूर सुनील विटकर (वय-21), अतुल अनिल धोत्रे (वय-23), सागर विनायक मंगळवेढेकर, प्रणव अर्जुन झडपे (वय22 सर्व रा. वडारवाडी), साहील विटकर आणि आकाश ओरसे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अली जावेद शेख (वय-23 रा. वडारवाडी, पुणे) याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pune Crime)

 

अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी मयुर विटकर याचे वकील प्रसाद निकम यांनी कोर्टात युक्तिवाद करताना सांगितले की, ज्या वेळी ही घटना घडली त्यावेळी आरोपी हे क्रिकेटच्या मैदानावर होते. तर एकजण हा त्याच्या ऑफिसमध्ये काम करत होता. फिर्यादी यांनी पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरुन आरोपींची नावे घेतली असल्याचा युक्तिवाद केला. ॲड. प्रसाद निकम यांना कामकाजामध्ये ॲड. तन्मय देव (Adv. Tanmay Dev), ॲड. मन्सूर तांबोळी (Adv. Mansoor Tamboli) आणि ॲड. ऋषीकेश सुभेदार (Adv.Hrishikesh Subhedar) यांनी मदत केली.

काय आहे प्रकरण ?
विजय विटकर आणि जखमी सलीम यांच्यामध्ये पूर्वी भांडण (Dispute) झाले होते. या भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. सोमवारी रात्री फिर्यादी यांचा भाऊ सलीम व त्याचे मित्र शुभम दुबळे, मानव शेलार हे उत्तरादेवी जिमच्या (Uttaradevi Gym) समोर शेकोटी करुन गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी विजय विटकर हा आपल्या साथिदारांसह त्याठिकाणी आला.

 

विजय विटकर याने सलीमला ‘तुला लय माज आला आहे, तुला जिवंत सोडत नाही’ असे म्हणत त्याचा शर्ट पकडून शिवीगाळ करुन हातातील लोखंडी कोयत्याने डोक्यात वार केले.
तसेच इतर साथिदारांनी लोखंडी रॉड व बंबुने मारहाण (Beating) केली.
सलीम याचे मित्र शुभम आणि मानव हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली.
तसेच ‘आमच्या भांडणात पडलात तर कोणालाच जीवंत सोडणार नाही’ अशी धमकी (Threat) दिली.
त्यानंतर आरोपी परिसरात दहशत निर्माण करुन जोरजोरात ओरडत निघून गेले.

 

Web Title :- Pune Crime | Earlier a youth was stabbed and six others were remanded in police custody

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा