Pune Crime | 1 कोटी 81 लाखांचा अपहार ! बँक मॅनेजरसह चौघांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पाण्याचे मीटर (Water Meter) घेऊन त्याचे पैसे न देता, बँकेशी संगनमत (Conspiracy With Bank) करुन चुकीचा रिपोर्ट (False Report) पाठवून १ कोटी ८१ लाख ८४ हजार रुपयांचा अपहार (Fruad Case) केल्याप्रकरणी बँक मॅनेजरसह (FIR On Bank Manager) चौघांवर कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत विनायक श्रीनिवास गद्रे (वय ३७, रा. आयडीयल कॉलनी, कोथरुड – Ideal Colony, Kothrud) यांनी फिर्याद (गु. रजि. नं. १२९/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चेतस कंट्रोल सिस्टिम प्रा. लि. (Chetas Control Systems Pvt Ltd) त्याचे व्यवस्थापकीय संचालक महेश देशमुख (Mahesh Deshmukh), हेमंत पन्हाळकर (Hemant Panhalkar), बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक जया कस्तुरे (Bank Of India Manager Jaya Kasture) व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे (Pune Crime) . हा प्रकार १६ डिसेंबर २०१९ ते २९ सप्टेबर २०२१ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची अ‍ॅडेप्ट फ्लुडाईन नावाची कंपनी आहे. कंपनीमार्फत पाण्याचे मीटर बसविण्याचे काम केले जाते. आरोपींनी संगनमत करुन बँक गॅरंटीची एकूण १ कोटी २४ लाख २० हजार २०० रुपये व एकूण १ हजार पाण्याचे मीटरचे एकूण ५७ लाख ६३ हजार ८८४ रुपये असे एकूण १ कोटी ८१ लाख ८४ हजार ८४ रुपये ऐवढे पैशांबाबत वेळोवेळी ई मेल तसेच पत्रव्यवहार केला. समक्ष भेटून पैशांची मागणी केली. तरीही त्यांनी फिर्यादीस उडवाउडवीची उत्तरे दिली. १४०० मीटरचे देय असलेली रक्कम फिर्यादीचे अ‍ॅडेप्ट फ्लुडाईन कंपनीस दिली नाही. तसेच फिर्यादीचे नुकसान व्हावे, म्हणून थर्ड पार्टी रिपोर्ट चुकीचा पाठवून बँकिंग नियमांचे उल्लंघन करुन या रक्कमेचा बेकायदेशीरपणे व अनाधिकाराने अपहार करुन फिर्यादीची फसवणूक (Cheating Case) केली. त्यामुळे फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या (Pune Shivaji Nagar Court) आदेशानुसार कोथरुड पोलिसांनी सीआरपीसी १५६/३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Embezzlement of 1 crore 81 lakhs! Charges filed against four including bank manager

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त