Pune Crime | डोनेशन मिळवण्यासाठी बँकेच्या पैशांमध्ये अपहार, गुन्हे शाखेकडून बँकेच्या डेप्युटी मॅनेजरसह तिघांना अटक; 2 कोटींची रोकड जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने (Crime Branch Unit 4) दोन कोटी रुपयांची रोकड जप्त (Cash Seized) केली होती. याप्रकरणी तिघांना अटक (Arrest) करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती (Pune Crime) समोर आली आहे. आरोपींमध्ये अंबेगाव तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या (Bank of Maharashtra) मंचर करंन्सी चेस्टचा (Manchar Currency Chest) डेप्युटी मॅनेजरचा (Deputy Manager) समावेश आहे.

 

अमोल गोरखनाथ कंचार Amol Gorakhnath Kanchar (वय-45 रा. रोशन को-ऑप. सोसायटी, गारखेडा परिसर, औरंगाबाद-Aurangabad), संतोष वैजनाथ महाजन Santosh Vaijnath Mahajan (वय-43 रा. वृंदावननगर, गार्डन काउन्टी, नाशिक-Nashik), सुशील सुरेश रावले Sushil Suresh Rawle (वय-34 रा. कुबेरा लॅन्ड मार्क, मंचर, ता. आंबेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सुशील रावले हा बँकेचा डेप्युटी मॅनेजर आहे. तर अमोल कंचार याचे ‘कंचार फाऊंडेशन’ (Kanchar Foundation) आहे. ( Pune Crime)

 

गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलीस अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती की, काही जण पांढऱ्या रंगाच्या कारमधून बनावट नोटा (Fake currency Notes) घेऊन पुण्यातील कॅम्प (Pune Camp) परिसरातील एस.जी.एस मॉल (SGS Mall) येथे येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. त्यावेळी मिळालेल्या वर्णनाची कार येताना दिसली. मात्र कार मॉल जवळ न थांबता वेलस्ली रोडवरील (Wellesley Road) पेट्रोल पंपाच्या जवळ थांबली. पोलिसांनी कारला चारी बाजूने घेरुन गाडीची तपासणी केली असता गाडीतील दोन बॅगांमध्ये भारतीय चलनाच्या (Indian Currency) 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचे बंडल एकूण 2 कोटी रुपये मिळाले.

आरोपींकडे सखोल चौकशी केली असता, सुशील रावले याने पदाचा गैरवापर करुन मंचर करंन्सी चेस्ट मधून पैसे आणल्याचे निष्पन्न झाले. आरोपी ही रक्कम एका मोठ्या कंपनीला देऊन दिलेल्या पैशापेक्षा अधिकची रक्कम अमोल कंचार याच्या ‘कंचार फाउंडेश’ चॅरिटेबल ट्रस्टच्या बँक खात्यावर डोनेशन (Donation) म्हणून आरटीजीएस करुन घेणार होते. फाऊंडेशनच्या बँक खात्यावर जमा झालेल्या रक्कमे पैकी काही रक्कम ते वाटून घेणार होते. तर उरलेल्या रकमेमधून आरोपी अमोल कंचार हा शिक्षण संस्थेची इमारत बांधणार होता.

 

या कामासाठी संतोष महाजन याची मोठी मदत झाल्याने त्याला काही रक्कम आणि इमारतीच्या बांधकामाचा ठेका दिला जाणार होता. तसेच कंपनीकडून फाऊंडेशनच्या खात्यावर पैसे जमा होताच त्यातून मिळालेल्या रकमेतून अमोल कंचार हा दोन कोटी रुपये बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा मंचर करंन्सी चेस्ट खात्यावर आटीजीएस करणार होता.

 

पोलिसांनी केलेल्या तपसात ही रक्कम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने (RBI) बँक ऑफ महाराष्ट्र,
मंचर करंन्सी चेस्ट शाखेला महाराष्ट्र बँकेच्या 26 शाखा व इतर बँकांना पैशांचा पुरवठा करण्यासाठी साठवून ठेवलेल्या रकमेपैकी असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींविरुद्ध पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) मंचर पोलीस ठाण्यात (Manchar Police Station)
आयपीसी 408, 409, 420, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने (Police Inspector Ganesh Mane),
सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव (API Vikas Jadhav), पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील (PSI Jaideep Patil),
सहायक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पवार पोलीस अंमलदार हरीष मोरे, संजय आढारी, प्रविण भालचीम, विठ्ठल वाव्हळ,
अजय गायकवाड, नागेशसिंग कुँवर, विनोद महाजन, स्वप्निल कांबळे, सारस साळवी, अशोक शेलार, रमेश राठोड,
मनोज सांगळे, वैशाली माकडी, शितल शिंदे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Embezzlement of bank money to get donation, Crime Branch arrests three including deputy manager of bank; 2 crore cash seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Salaam Venky Movie| ‘सलाम वेंकी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलिज , अभिनय आणि संवाद जिंकतील तुमचे मन

Jitendra Awhad | ‘असल्या आरोपांतून घरे उद्धवस्त होतील, त्यापेक्षा राजकारणात न राहिलेले बरे’ – जितेंद्र आव्हाड

Radhakrishna Vikhe Patil | राज ठाकरेंच्या भविष्यवाणीवर विखे पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…