Pune Crime | कामाचे आगाऊ पैसे देण्यास मालकाने दिला नकार, कामगाराने डायरेक्ट उचललं ‘हे’ पाऊल

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – जादा काम केल्याचे पैसे देण्यास नकार दिल्याने कामगाराने रागाच्या भरात दुकानाला आग (shop fire) लावल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) परिसरातील थेरगाव येथे गुरुवारी (दि.2) पहाटे तीन वाजता ही घटना घडली होती. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad police station) कामगारावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

दुकान मालक शंकर लक्ष्मण सोनवणे (वय-51 रा. नखातेनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रकाश शंकरराव सोनकांबळे (रा. खंडरे गल्ली, ता. भालकी, जि. बिदर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कामगाराने लावलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनवणे यांच्या मुलाचे थेरगाव येथील दत्त नगरमध्ये ओम साई कुशन वर्क नावाचे दुकान आहे. या दुकानात आरोपी प्रकाश सोनकांबळे हा काम करत होता. त्याने मालकाकडे कामाचे आगाऊ पैसे मागितले (pay advance) होते. मात्र, मालकाने पैसे देण्यास नकार दिला. याचा राग मनात धरुन आरोपी प्रकाश याने गुरुवारी पहाटे दुकान आतून बंद केले आणि शिवीगाळ करत दुकानाला आग लावली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | employer did not pay advance work worker set shop fire in pimpri chinchwad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Anti Corruption Bureau Pune | 15 हजाराची लाच घेताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील 2 लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Suvarna Vijay Diwas | आगामी काळात पाकिस्तानचे विभाजन अटळ – लेफ्टनंट जनरल शेकटकर (निवृत्त)

Mesma Act | ‘सरकारचा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा विचार’ – अनिल परब

Pune Crime | PMPML बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणारा परराज्यातील सराईत गजाआड; 38 मोबाईलसह 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

Omicron Covid Variant | भारतात ओमिक्रॉनच्या अगोदर रूग्णांमध्ये दिसून आली ‘ही’ लक्षणे, तुम्ही सुद्धा व्हा सावध

Pune Crime | पुण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना ! YouTube वरील व्हिडिओ पाहून 3 वर्षीय चिमुकलीवर भावाकडूनच लैंगिक अत्याचार

Ankita Lokhande | अंकिता लोखंडेच्या लग्नाच्या विधींना झाली सुरुवात, मराठमोळा लुकमध्ये अभिनेत्रीने शेअर केले फोटो

India First Electric Cruiser Bike | भारताची पहिली ‘इलेक्ट्रिक क्रूझर बाईक’ आणतेय स्वदेशी कंपनी, फुल चार्जमध्ये देईल 250Km पर्यंत रेंज, जाणून घ्या सविस्तर