Pune Crime | पुण्यात इंजिनिअरची 15 लाखाची फसवणूक; आनंद जुन्नरकर, त्याच्या पत्नीसह 6 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइनPune Crime | बिटकॉइन (bitcoin) पेक्षाही अधिक परतावा मिळेल असे सांगत “जर्मनीच्या मोनेश क्लासिस एक्सएमआरओ (XMRO) या आभासी चलनात (virtual currency) पैसे गुंतवण्यास भाग पाडून एका इंजिनिअरची 15 लाख रुपयांची फसवणूक (Pune Crime) करण्यात आली असल्याचा प्रकार समोर आला आहे. 2017 ते 2021 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी आनंद जुन्नरकर, त्याची पत्नी, अतुल पाटील, परशुराम पाटील, रघुनाथ बोडखे आणि अजित शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत धीरज जगदाळे (वय 47) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज हे इंजिनिअर आहेत. तर सहकारनगर (Sahakarnagar) परिसरात पाटील याचे ऑफिस होते. त्याठिकाणी जुन्नरकर काम करत होता. दरम्यान फिर्यादी व त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांनी फिर्यादीना बिटकॉइन सारखे जर्मनीचे मोनेश क्लासिस एक्सएमआरओ (XMRO) आभासी चलन आहे.

यात गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळेल असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यासाठी 3 लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तसेच, बिटकॉइन आणि इथोरियम याच्या वॉलेटवरील आभासी चलन (क्रिप्टकरन्सी) असे एकूण 15 लाख रुपये पाठवून त्यांना कोणत्याही प्रकारची रक्कम न देता फसवणूक केली आहे. याबाबत त्यांनी सायबर पोलिसांकडे (Pune Cyber Police) अर्ज केला होता.
या अर्जाची सायबर पोलिसांनी चौकशी केली. यानंतर गुन्हा (Crime) दाखल केला आहे.
अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title :  Pune Crime | Engineer cheated of Rs 15 lakh in Pune; FIR against 6 persons including Anand Junnarkar and his wife

Pandharpur Wari 2021 : संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या पालख्या शिवशाही बसने पंढरपूरकडे मार्गस्थ

pandharpur ashadhi ekadashi 2021 update : महापूजेसाठी फक्त ठाकरे कुटुंबाला प्रवेश; मुख्यमंत्र्यांसमवेत ‘या’ दाम्पत्याला मिळणार महापूजेचा मान

Instant Sugar Control | इन्स्टंट शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज इतक्या प्रमाणात प्या भेंडीचे पाणी