Pune Crime | पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक प्रकार ! ‘YouTube’ पाहून इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यानं बनावट पेमेंट अ‍ॅपद्वारे 25 सराफांना घातला गंडा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सोने खरेदी करुन बनावट पेमेंट अ‍ॅपच्या माध्यमातून एका युवकाने तब्बल 25 सराफांना गंडा (fraud) घातल्याचं समोर आलं आहे. हा युवक इंजिनियरिंगमध्ये शिकत आहे. निखिल सुधीर जैन (Nikhil Sudhir Jain) (वय 22, रा. उंड्री, पुणे, मूळ रा. औरंगाबाद) असं आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 105 ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, दुचाकी, असा एकूण 5 लाख 77 हजार 611 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या (Crime Branch) गुंडा विरोधी पथकाने केली आहे. (Pune Crime)

 

याबाबत माहिती अशी, आरोपी निखिल जैन (Nikhil Sudhir Jain) हा पैसे मिळवण्यासाठी युट्युबवर व्हिडिओ सर्च करायचा. त्यात त्याला बनावट प्रॅंक पेमेंट अ‍ॅप व वाॅलेटबाबत माहिती मिळाली. त्यातून त्याने फसवणुकीची (fraud) युक्ती शोधली. पुणे आणि पिंपरी -चिंचवड (Pune and Pimpri-Chinchwad) परिसरातील सराफी दुकानांतून सोने खरेदी करून बनावट अ‍ॅप्लिकेशनमधून पेमेंट केल्याचा तो बनाव करायचा. पेमेंटसाठी दुकानातील क्युआर कोड स्कॅन करून त्यावर पेमेंट पाठवले असल्याचा मेसेज दुकानदारांना दाखवायचा. पण, बोगस अ‍ॅप्लिकेशनमधून पेमेंट जात नव्हते. तर, चिंचवडच्या सराफाकडून आरोपीने सोन्याचे नाणे खरेदी केले. त्याचे पैसे ट्रान्सफर झाल्याचा मेसेज त्याने दुकानदाराला दाखवला. पण, पैसे खात्यावर न आल्याने दुकानदाराने चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) तक्रार केली. यानंतर परिसरातील 274 सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. (Pune Crime)

दरम्यान, चौकशीत त्या आरोपीने पिंपरी-चिंचवडमधील 6, पुण्यातील 17 आणि पुणे ग्रामीणमधील 2 सराफ दुकानदारांची अशा प्रकारे फसवणुक केल्याचे समोर आले. अशी माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash) यांनी दिली. दरम्यान, ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर (ACP Prashant Amrutkar) यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय हरीश माने (API Harish Mane), पोलीस कर्मचारी हजरत पठाण (Hazrat Pathan), प्रवीण तापकीर (Praveen Tapkir), सोपान ठोकळ (Sopan Thokal), विक्रम जगदाळे (Vikram Jagdale), गंगाराम चव्हाण (Gangaram Chavan), गणेश मेदगे (Ganesh Medage), सुनील चौधरी (Sunil Chaudhary), विजय तेलेवार (Vijay Telewar), नितीन गेंगजे (Nitin Gangje), शाम बाबा (Sham Baba), रामदास मोहिते (Ramdas Mohite), शुभम कदम (Shubham Kadam), ज्ञानेश्वर गिरी (Dnyaneshwar Giri) यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | engineering student watching youtube and 25 jewellery shops smuggled through fake payment app

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EDLI | खुशखबर ! नोकरी करणार्‍यांना मोफत मिळेल पूर्ण 7 लाखाचा फायदा, जाणून घ्या – काय आहे पद्धत?

Pankaja Munde | गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र; 12 डिसेंबरला नवा संकल्प कराल का? 

SIM Cards New Rule | सिम कार्डबाबत नवा नियम जारी ! आपल्याकडे जादा सिम कार्ड आहेत का? तर मग ‘हे’ अनिवार्य असणार; जाणून घ्या