Pune Crime | शिक्षणाच्या माहेरघरात बाऊन्सरकडून पालकांना धक्काबुक्की, पुण्यातील खासगी शाळेतील धक्कादायक प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एका खासगी शाळेत पालकांना बाऊन्सरकडून धक्काबुक्की (School Bouncer Beaten Parents In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उंड्री भागातील युरो शाळेच्या (Euro School Undri) सुरक्षा रक्षकांकडून (Security Guards) पालकांना ही अपमानास्पद वागणूक मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यातील (Pune Crime) बिबवेवाडी येथील क्लाइन मेमोरियल शाळेनंतर (Kline Memorial School Bibwewadi) उंड्रीत असा प्रकार घडल्याने पालकांकडून संताप व्यक्त होत आहे. शाळेच्या शुल्काबाबत (School Fee) शिक्षण उपसंचालक (Deputy Director of Education) यांच्याकडे तक्रार करणाऱ्या पालकांना शाळेकडून दुजाभाव करण्यात आला. तसेच संबंधित विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारून शिक्षण मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे पाहायला मिळत आहे. (EuroSchool Throws Out Mother Of Student Over Fee Issue, Deputy Director Of Education Intervenes)

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

काही दिवसांपूर्वी बिबवेवाडी येथील शाळेतील बाऊन्सरकडून पालकांना मारहाण करण्यात आल्याचा मुद्दा विधानसभेत (Maharashtra Legislative Assembly) गाजला.
यानंतर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी शांळांनी खासगी बाऊन्सर ठेऊ नयेत अशा सूचना दिल्या होत्या.
मात्र शाळेत प्रवेश नाकारल्याने विद्यार्थ्यांचे पालक शाळेत पोचले आणि शाळेतील सुरक्षा रक्षकांनी आणि बाऊन्सर यांच्याकडून पालकांना धक्काबुक्की करण्यात आली.( Pune Crime)

 

काही विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला नसल्याने पालकांनी पुन्हा एकदा पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे (Audumbar Ukirade) यांची भेट घेतली.
उपसंचालकांनी पालकांना सांगितले की, मी स्वत: शाळेला भेट देणार असून शाळेच्या काही त्रुटी आढळून आल्यास शाळेवर कडक कारवाई करण्यात येईल,
असे आश्वासन उकिरडे यांनी पालकांना दिले.

 

Web Title :- Pune Crime | EuroSchool Undri Throws Out Mother Of Student Over Fee Issue, Deputy Director Of Education Intervenes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis – Raj Thackeray | मनसे-भाजपचं होणार मनोमिलन ?; नितीन गडकरींनंतर फडणवीस घेणार राज ठाकरेंची भेट !

 

Chhagan Bhujbal On Raj Thackeray | राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याची राज ठाकरेंवर टीका, म्हणाले – ‘भाजपाविरोधात बोलता बोलता कोहिनूर टॉवर एकदम हलायलाच लागला’

 

Obesity And Acidity | पाण्यात ‘ही’ एक वस्तू मिसळून पिण्यास करा सुरूवात, वितळू लागेल चरबी आणि दूर होईल अ‍ॅसिडिटी