Homeक्राईम स्टोरीPune Crime | 3 दिवसांपासून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात...

Pune Crime | 3 दिवसांपासून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ ! युवकाचा झाला होता प्रेमविवाह, पुण्याच्या हांडेवाडी-लोणी काळभोर येथील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime |  तीन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या तरुणाचा (Missing Youth) मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून (Found Dead Body) आल्याने पुण्यातील (Pune Crime) हांडेवाडी (Handewadi) परिसरात खळबळ उडाली आहे. बेपत्ता तरुणाचा खून (Murder In Pune) करुन पुरावा नष्ट (Evidence Destroyed) करण्यासाठी मृतदेह मातीत पुरला होता. बेपत्ता तरुणाचा शोध घेत असताना हांडेवाडी येथील पाटील व्ह्यू सोसायटीजवळ मातीत अर्धवट पुरलेला मृतदेह आढळून आला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

किरण रोहिदास हांडे Kiran Rohidas Hande (वय-20 रा. उरुळी कांचन-Uruli Kanchan) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.  किरण हांडे हा शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता झाला होता. याबाबत त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात पती बपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. लोणी काळभोर पोलिसांनी खून व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, किरण याचा प्रेमविवाह (Love Marriage) झाला होता.
तो हांडेवाडी परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होता. किरणचे आई-वडिल पुण्यात राहात असून तो एका गॅरेजमध्ये कामाला होता.
याच परिसरात त्याचे तीन ते चार मित्र आहेत. शुक्रवारी रात्री तो घरी आला नाही.
रात्रभर पती घरी आला नसल्याने त्याच्या पत्नीने शनिवारी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. (Pune Crime)

बेपत्ता किरणचा शोध त्याची पत्नी, नातेवाईक आणि पोलीस घेत होते.
शोध घेत असताना हांडेवाडी येथील पाटील व्ह्यू सोसायटीच्या मागील बाजूला मोकळ्या मैदानात दारु (Alcohol) पिण्यास बसले असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार नातेवाईकांनी परिसराची पाहणी केली असता, त्यांना मातीत पुरलेला मृतदेह दिसला.
त्यांनी तातडीने पोलिसांना याची दिली. पोलीस निरीक्षक सुभाष काळे (Police Inspector Subhash Kale)
व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
किरण हांडे याचा खून नेमका कोणी केला हे अद्याप समजू शकले नसून आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुरला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Excitement in the area as the body of a youth who has been missing for 3 days was found buried! The incident took place at Handewadi-Loni Kalbhor in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune NCP | आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय उद्योग – व्यापारास संधी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चर्चासत्रात चर्चा

 

Sharad Pawar On Pune Airport Issue | पुणे विमानतळाचा प्रश्न 15 दिवसात मार्गी लावणार – शरद पवार

 

FMCG Price Increase | 10 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात रोजच्या वापरातील ‘या’ गोष्टींचे दर, कंपन्यांनी केली तयारी

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News