क्राईम स्टोरीपुणे

Pune Crime | पुण्यातील लॉजमध्ये जोडप्याचे नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

पुणे / दिघी : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune Crime) दिघी परिसरात एका लॉजमध्ये जोडप्याचे नग्नावस्थेत मृतदेह आढळून (two naked dead bodies found in pune) आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. पुण्यातील (Pune Crime) दिघी येथील मॅगझीन चौकात असलेल्या अथर्व लॉजमध्ये आज (गुरुवार) सकाळी हे मृतदेह आढळून आले आहेत. घटनेची माहिती मिळताच दिघी पोलिसांनी (Dighi police) घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले.

 

मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश महादेव ठोसर Prakash Mahadev Thosar (वय 28) हा अजंठानगर झोपडपट्टी परिसरातील रहिवासी आहे. तर 30 वर्षीय महिला देखील याच परिसरातील आहे. या दोघांचे मृतदेह मॅगझीन चौकातील अथर्व लॉजमध्ये नग्नावस्थेत आढळून आले आहेत. मृत तरुण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचे आणि महिलेचे मागील काही वर्षापासून प्रेमसंबंध होते.
मयत तरुण हा सराईत गुन्हेगार (Criminal) असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
तसेच महिलेच्या पतीविरोधात देखील गुन्हे दाखल असून सध्या तो कारागृहात आहे.
बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास ते दोघे लॉजमध्ये आले होते. त्यानंतर ते रुमच्या बाहेर आले नाही.
आज सकाळी 10 वाजता चेक आऊट करण्यास सांगण्यासाठी मॅनेजर गेले होते. त्यावेळी खोलीचा दरवाजा आतून बंद होता.

 

 

लॉजच्या सुरक्षा रक्षकांनी दरवाजा उघडला असता महिला बेडवर पडलेली होती. तर प्रकाश ठोसर याने साडीने छताच्या पंख्याला गळफास (Suicide) लावून घेतल्याचे दिसून आले. दोघेही नग्नावस्थेत होते. या घटनेबाबत दिघी पोलिस स्टेशनला (Dighi police station) कळविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा (Pune Crime) करुन मृतदेह वायसीएम रुग्णालयात (YCM Hospital) शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. उत्तरीय तपासणीत मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Excitement over finding naked body of a couple in a lodge in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Back to top button